शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजे.. तुम्ही यायला हवं होतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं!’ अशा भाषेत अनेकांनी मतं व्यक्त केली असून ‘राजकीय नेत्यांना या मोर्चात संतप्त भावनांना सामोरं जावं लागणार, हे माहीत असल्यानंच आमच्या राजेंनी हा निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं!’ अशा भाषेत अनेकांनी मतं व्यक्त केली असून ‘राजकीय नेत्यांना या मोर्चात संतप्त भावनांना सामोरं जावं लागणार, हे माहीत असल्यानंच आमच्या राजेंनी हा निर्णय घेतला,’ असंही समर्थन अनेकांनी केलं.नाशिक येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर साताºयाचे उदयनराजे अन् कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती या मोर्चाचं नेतृत्व करतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. उदयनराजे यांच्या वेगळ्या स्टाईलची महाराष्ट्रातील तरुणवर्गाला भलतीच क्रेझ असल्यानं बुधवारच्या मुंबई मराठा मोर्चात त्यांच्या एन्ट्रीकडं साºयांचंच लक्ष लागून राहिलं होतं.उदयनराजे मुंबईतील क्रांती मोर्चाला जाणारच, हे गृहीत धरून बंदोबस्तासाठी खास साताºयावरून पोलिस पथक पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गेलं होतं. मात्र, ऐनवेळी त्यांनी या पथकाला परत पाठवून देऊन ते स्वत: मात्र पुण्यातच थांबल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश नेते या मोर्चात सहभागी झालेले असतानाही केवळ उदयनराजे हेच मोर्चात न दिसल्यानं आपापल्या गावी परत निघालेल्या मोर्चेकºयांमध्ये हा विषय भलताच चर्चेचा ठरला होता.म्हणे मोदींनी केली होती विनंती !उदयनराजे यांचे खास समर्थक असलेल्या साताºयातील राजू गोडसे यांनी बुधवारी रात्री याबाबत एक निवेदनवजा पोस्ट फेसबुकवर टाकली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘मोर्चाच्या आदल्या रात्रीपर्यंत स्वत: महाराजांनी संयोजकांशी संवाद साधून चर्चा केली होती. मात्र, तरुणांचा उत्साह पाहता शांतता राखली जावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना मोर्चात न जाण्याची विनंती केल्यामुळेच राजे यात सहभागी झाले नाहीत.’ही पोस्ट फिरू लागताच संमिश्र भावनांच्या प्रतिक्रिया धडाधड व्यक्त होऊ लागल्या. ‘पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना धन्यवाद. त्यांना जनतेची काळजी आहे वाटतं,’ अशा शब्दात एका जाणकारानं खोचक मत व्यक्त केलं, तर त्यांना मानणाºया बहुतांश समर्थकांनी, ‘कारण काहीही असो... राजे, तुम्ही मोर्चात यायलाच हवं होतं,’ अशी आर्त साद दिल्याचंही सोशल मीडिया दिसलं.काहीजणांनी तर या पोस्टला चक्क ‘जोक’ असं म्हणत, आपली भावना व्यक्त केली. दरम्यान, राजे न येण्याच्या कारणाबाबत अनेक प्रतिक्रिया पडत असतानाच ही पोस्ट अकस्मातपणे गायबही झाली. उदयनराजेंचे खास समर्थक म्हणून ओळखल्या जाणाºया राजू गोडसे यांच्या पत्नी दीपाली गोडसे या उदयनराजे गटाकडून साताºयाच्या उपनगराध्यक्षा होत्या.