शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

उंचीरोधक उभारले; पण चारचाकींची प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:38 IST

कऱ्हाड : शासकीय कामात होणारी दिरंगाई सर्वश्रुत आहे; पण कोयना नदीवरील येथील ब्रिटिशकालीन पुलाबाबत बांधकाम विभागाने चालविलेला चालढकलपणा सध्या ...

कऱ्हाड : शासकीय कामात होणारी दिरंगाई सर्वश्रुत आहे; पण कोयना नदीवरील येथील ब्रिटिशकालीन पुलाबाबत बांधकाम विभागाने चालविलेला चालढकलपणा सध्या चर्चेचा विषय बनलाय. या पुलावरून हलकी वाहतूक आठवड्यात सुरू होईल, असे माजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, दोन महिने उलटले तरी या घोषणेला मूर्त रूप आलेले नाही. जुन्या पुलावरून अद्यापही चारचाकी वाहतुकीची प्रतीक्षा कायम आहे.

साताऱ्यासह कोकणातून येणारी वाहने कोयना नदीवरील पुलावरून कऱ्हाडात प्रवेश करतात. नदीवर त्यासाठी चौपदरी मोठा पूल आहे. मात्र, दैत्यनिवारणी मंदिरानजीक ब्रिटिशकालीन लोखंडी पूल असून या पुलावरून केवळ दुचाकीची वाहतूक होते. पूल कमकुवत झाल्यामुळे पुलावरील चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तसेच पुलाच्या दोन बाजूस खांब उभारण्यात आले. या खांबांमधून वाट काढीत केवळ दुचाकी व पादचारीच या पुलावरून ये-जा करतात. काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाच्या मजबुतीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यातून मजबुतीकरणाचे कामही करण्यात आले. या कामानंतर येथून चारचाकी वाहतूक सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतरही पूल चारचाकीसाठी बंदच होता. गत दोन महिन्यांपूर्वी पुन्हा या पुलाचा सर्व्हे करण्यात आला. चारचाकी वाहतुकीसाठी पूल सुरक्षित आहे का, याची खातरजमा करण्यात आली. वाळूने भरलेले डंपर पुलावरून नेण्यात आले. तसेच सकाळी, दुपारी आणि रात्री उशिरा तापमानाचा पुलावर होणारा परिणामही तपासण्यात आला. सर्व चाचण्या पार पडल्यानंतर पूल हलक्या वाहनांसाठी खुला करता येऊ शकतो, असे निष्पन्न झाले.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही पुलाची पाहणी केली. त्यावेळी पूल हलक्या चारचाकी वाहनांसाठी आठवड्यात खुला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अद्यापही पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही. पुलाचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे.

- चौकट

चारचाकी वाहतुकीत अडथळे

१) पुलाची रुंदी कमी असल्याने अपघाताचा धोका

२) दोन्ही बाजूस रस्त्याची झालेली दुरवस्था

३) दैत्यनिवारणी मंदिरानजीक खचलेला रस्ता

४) पुलापासून वारुंजी फाट्यापर्यंतचे अतिक्रमण

५) रस्त्यावर बसणारे किरकोळ विक्रेते

- चौकट

झोपडपट्टीचं काय करणार..?

जुन्या पुलाच्या पूर्व बाजूला दैत्यनिवारणी मंदिरानजीक रस्त्यालगतच झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीचा प्रश्नही अद्याप जैसे थे आहे. चारचाकी वाहतूक सुरू करण्यापूर्वी झोपडपट्टीच्या सुरक्षेचा विषय बांधकाम विभागाला मिटवावा लागेल. झोपडपट्टीसमोर संरक्षक रेलिंग अथवा कठडे उभारणे गरजेचे आहे. मात्र, त्याबाबत कसलीच कार्यवाही अद्याप झालेली नाही.

- चौकट

उंचीरोधक उभारण्याची गडबड

पुलाच्या दोन्ही बाजूस बांधकाम विभागाने उंचीरोधक खांब उभारले आहेत. रस्त्यासह इतर प्रश्न अद्याप मिटलेले नसताना, उंचीरोधक उभारण्याची गडबड कशासाठी, हा प्रश्न आहे.

- चौकट

पुलाचा लेखाजोखा

जुलै १८५६ : बांधकाम सुरू

१ मे १८७२ : वाहतुकीस खुला

- चौकट

पुलाची वैशिष्ट्ये...

१) एकुण आठ कमानी

२) अंशत: दगडी बांधकाम

३) अंशत: लोखंडी काम

४) लोखंडी तुळयांचा वापर

- चौकट

हलकी वाहतूक सुरू झाल्यास...

१) कोल्हापूर नाक्यावरील ताण कमी होणार

२) कोल्हापूर नाक्यापासून दत्त चौकापर्यंतची कोंडी कमी

३) पुणे, सातारा, पाटणकडून येणारी वाहने जुन्या पुलावरून कऱ्हाडात येणार

४) दैत्यनिवारणी मंदिरापासून शाहू चौक रस्त्याला वर्दळ वाढणार

५) बाजारपेठ विस्ताराला वाव मिळणार

फोटो : २५केआरडी०१

कॅप्शन :

कऱ्हाडात कोयना नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावर हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी उंचीरोधक खांब उभारण्यात आले आहेत.