शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

‘लावणी शो’ला टाळ्यांचा पाऊस

By admin | Updated: February 9, 2015 00:48 IST

फलटण : ठेका धरायला लावणाऱ्या अस्सल मराठमोळी गाण्यांना दाद

फलटण : ठेका धरायला लावणारी अस्सल मराठमोळी गाणी... शिट्ट्या अन् टाळ्यांचा पडणारा पाऊस... हे चित्र होते फलटणमधील लावणी कार्यक्रमाचे. वारंवार होणारी ‘वन्समोअर’ची मागणी. यामध्ये लावणी नृत्यांगणा चैत्रालीराजे यांचा लावणीचा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला.‘लोकमत सखी मंच’च्या फलटण येथील यावर्षीच्या पहिल्याच कार्यक्रमाची धडाकेबाज सुरुवात महिलांना आवडणाऱ्या लावणीच्या कार्यक्रमाने करण्यात आली. त्यातच चैत्रालीराजेची लावणी म्हटल्यावर सखींनी येथील राजलक्ष्मी लॉन तुडुंब भरून गेले होते. विक्रमी संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर फलटणच्या नगराध्यक्षा सारिका जाधव, स्वराज उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालिका अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, पंचायत समितीचे उपसभापती पुष्पा सस्ते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विमल साळुंखे-पाटील, सखी साडी सेंटरच्या रेखा बोळे, सोनाज ब्युटी पार्लरच्या मनीषा फलके, लक्ष्मी वुमन्स ब्युटीपार्लरच्या इरावती मुळीक, हॉटेल विसावाचे प्रभाकर पाटील, हॉटेल रघुनंदनचे सुरेश पोतेकर, शीला जगताप आदी उपस्थित होते.लावणीच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘तूच सुखकर्ता...’ या गाण्याने गणेशाला वंदन करून करण्यात आली. त्यानंतर अस्सल लावण्यांची बरसात सुरू झाली. ‘या रावजी, बसा भावजी...’, ‘जरा खाजवा की...’, ‘कारभारी दमानं...’, ‘नाद खुळा...’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल...’ आदी गाण्यांनी सखींना ठेका धरायला लावला. ठेकेबाज गाण्यांना व नृत्यांना सखींनी उत्स्फूर्त साथ दिली. काही सखींनी रुमाल हवेत भिरकावले, काहीनी शिट्ट्या वाजवल्या तर काहीनी टाळ्यांच्या गजर करत दाद दिली. काही सखींनी जागेवर तर काहीनी व्यासपीठावर जाऊन ठेका धरला. चैत्रालीराजेच्या प्रत्येक अदाकरीला उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यांना दर्शना, पल्लवी, मोना, सिमरन, स्वाती, सोनाली या नृत्यांगणांनी साथ दिली. ढोलकीवर बाळासाहेब हिरगुडे, संदीप पवार, विशाल मोहिते, की बोर्डची साथ प्रकाश पवार यांनी दिली. सुनीता गायकवाड यांनी गायन केले. अभिजित राजेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)