शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठ्ठं !

By admin | Updated: June 6, 2016 00:44 IST

सातारकरांच्या मदतीला पोलिस अधिकारी धावले...

सातारा : रविवारचा दिवस सातारा जिल्ह्यासाठी घातवार ठरला. सकाळी उठल्या-उठल्या सातारकरांना पनवेलच्या अपघाताची बातमी समजली, तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. ‘सतरा ठार’मध्ये आपलं कोण आहे का, याचा शोध घेण्यासाठी प्रत्येकजण एकमेकांना फोन करु लागला. दिवसभरात एकेकाची माहिती मिळत गेली. रात्री नऊ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मृत्युमुखींपैकी तब्बल १४ जण जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं. एकाच गावातील चौघेजण मरण पावलेल्या सोनवडीत मात्र मृतदेह येण्यापूर्वी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती, कारण संध्याकाळचा पाऊस अंत्यविधीसाठी अडथळा तयार करु शकत होता. म्हणूनच की काय... परळी खोऱ्यात मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठं ठरल होतं.१५ दिवसांपूर्वी नातीचं बारसं झालेलं...अपघातात मृत्युमुखी पडलेली तीन महिन्यांची अनन्या हिचे बारसे १५ दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात गावामध्ये झाले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर मंडळी पुन्हा मुंबईला निघाली होती. मात्र, पहाटेच्या भीषण अपघातात तिचाही दुर्देवी मृत्यू झाल्याचे कळताच अवघा गाव हळहळला..वडील मात्र अनभिज्ञच..मूळचे सोनवडी गावातच राहणारे प्राध्यापक अविनाश हणमंत कारंडे (वय ३५) हे सुद्धा अपघातात मृत्युमुखी पडले. ते मुंबइला ‘एमडी’ कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते दोन दिवस सुटी असल्याने गावी आले होते. त्यांच्या वडिलांना पॅरालिसीस असल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत बातमीही पोहोचविली नाही. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.शेवटच्या ट्रीपनंतर सोडणार होते नोकरीइकबाल शेख हे गेल्या तीस वर्षांपासून लक्झरी बसवर चालक म्हणून काम करत होते. काही महिन्यांपूर्वीच मालकाने नवीन लक्झरी बस खरेदी केल्याने ते कामावर जात होते. कायमस्वरूपी नोकरी सोडण्याची त्यांची इच्छा होती. तसं घरातल्यांना त्यांनी बोलूनही दाखविले होते. ‘मुंबईला शेवटची ट्रीप मारल्यानंतर मी नोकरी सोडतो,’असेही ते बोलले होते. मात्र नोकरी सोडण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातलासातारकरांच्या मदतीला पोलिस अधिकारी धावले...विश्वास पांढरे-पाटील यांची घटनास्थळी धावपळसुटी संपवून ते निघाले होते गावीसंदीप शिवणकर हे मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीयांसमवेत गावी आले होते. सुटी संपल्याने ते मुंबईला निघाले होते. त्यांच्या निधनाने प्रभुचीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.श्रद्धा आली होती सुटीला महाबळेश्वरलाश्रद्धा काळे ही मूळची महाबळेश्वरची. ती मुंबई येथे महाविद्यालयात शिकत होती. कॉलेजला सुटी लागल्याने ती महाबळेश्वरला आली होती. सुटी संपल्यानंतर तीही सातारमधील नातेवाइकांसोबत मुंबईला निघाली होती. मात्र मुंबईला पोहोचण्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या मृत्यूची बातमी महाबळेश्वरमध्ये पसरताच अनेकांनी तिच्या घराकडे धाव घेतली.साताऱ्यातील त्यांचा शेवटचा कार्यक्रम ! पद्मा बलदवा यांचे माहेर सातारा आहे. दोन दिवसांपूर्वी त्या साताऱ्यात आल्या होत्या. शहरातील एका शाळेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर त्या मुंबईला निघाल्या होत्या. मात्र काळाने त्यांच्यावरही घाला घातला.अख्खा दिवस मृतदेहांची वाट पाहण्यात.. परळी खोऱ्यातील सोनवडी येथील शिवाजी कदम यांच्या घरातील सर्वच पुरूष मिलिटरीत. शिवाजीही निवृत्तीनंतर मुंबईत नोकरीला लागले. त्यांचे धाकटे बंधूसुद्धा मिलिटरीनंतर सध्या गावात असतात. शिवाजी आपली पत्न, सून अन् नातीला घेऊन सोनवडीत उन्हाळी सुटी व गावची यात्रा यानिमित्त आले होते. या सर्वांनी एक महिन्याची सुटी गावातच मजेत घालवली. शनिवारी (दि. ४ ) रोजी रात्री मुंबईला जायचे त्यांनी ठरविले. दुपारपासूनच बॅग भरून तयारी केली. रात्री ८ च्या दरम्यान घरातल्यांसोबत एकत्र जेवण केले. त्यानंतर ते, त्यांची पत्नी, सून व नात हे चौघेजण रात्री सातारा बसस्थानक परिसरातून खासगी बसने मुंबईला जायला निघाले. पहाटे भाऊ तानाजी कदम यांना ही घटना समजताच गावभर शोककळा पसरली. संपूर्ण गाव दिवसभर मृतदेहांची वाट पाहत बसले होते.