शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

कोयना वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:29 IST

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्देकोयना वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाची विश्रांतीकोयना धरणात ८५.९७ टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सलग २५ दिवसांहून अधिक काळ पाऊस पडत होता. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. तर कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम, बलकवडी आदी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला.

सध्या पाऊस थांबला असल्याने कोयना धरणातील पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजातून पाणी सोडणे यापूर्वीच बंद करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे फक्त ९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात ५८९९ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. बलकवडी धरणात २३६, कण्हेर ३८९, उरमोडी ६४५, तारळी धरणात ८२० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर कण्हेरमधून ५००, बलकवडी ३१५, उरमोडी ४०० आणि तारळी धरणातून ८२० क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ००  (४८२)कोयना ०९ (३४६१)बलकवडी ०० (१८१२)कण्हेर ०० (७७५)उरमोडी ०० (८७६​​​​​​​)तारळी ०० (१६००​​​​​​​​​​​​​​)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर