शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मंदावला; नवजाला ९४ मिलिमीटरची नोंद

By नितीन काळेल | Updated: June 18, 2025 19:39 IST

साताऱ्यात उघडझाप : कोयना धरणात ९ हजार क्युसेकने पाणी आवक 

नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मंदावला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ९४ तर महाबळेश्वरला ८२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात सकाळच्या सुमारास सुमारे ९ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २५.७० टीएमसी झाला होता.जून महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला होता. सुरूवातीला तीन दिवस दमदार पाऊस झाला. विशेष करुन पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयनागनर, नवजा येथे पावसाची संततधार होती. यामुळे भात खाचरात पाणी साचून राहिले. तसेच ओढे-नाले एक वाहून लागले.त्याचबरोबर पश्चिम भागातील पावसामुळे कोयना धरणात ही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ही वाढू लागला होता. पण, मंगळवारपासून पावसाचा जोर मंदावला आहे. अधूनमधून पावसाची उघडीप पडत आहे. तर पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. कधीतरी पावसाची एखादी राप येऊन जात आहे. यामुळे पूर्व भागात तरी खरीप हंगामातील पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.बुधवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे ९४ आणि महाबळेश्वरला ८२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ४६७, नवजा ४६० आणि महाबळेश्वर येथे ४०६ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८ हजार ९१२ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात २५.७० टीएमसी पाणीसाठा झालेला. २४.४२ टक्केवारी पाणी साठ्याची आहे.