शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कऱ्हाड तालुक्यात पावसाची ‘हॅट्ट्रीक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असून, आजअखेरच्या एकूण नोंदीनुसार उंब्रज मंडलात सर्वाधिक तर इंदोलीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असून, आजअखेरच्या एकूण नोंदीनुसार उंब्रज मंडलात सर्वाधिक तर इंदोलीत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७६८.६० मिलिमीटर झाले आहे. सद्यस्थितीत पाऊस या टप्प्याच्या उंबरठ्यावर असून, अपवाद वगळता सर्वच मंडलांमध्ये ५०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे. काही ठिकाणी तर ही नोंद सहाशे मिलिमीटरपेक्षा जास्त आहे.

जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण आणि त्यापाठोपाठ जावळी तालुक्याचे पर्जन्यमान जास्त आहे. त्याबरोबरच सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातही मोठ्या पावसाची नोंद होते. कऱ्हाड तालुक्याचा विचार करता, २०१५ सालापर्यंत तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६३२.०१ मिलिमीटर एवढे होते. मात्र, त्यानंतर पर्जन्यमान वाढले असून, कृषी विभागाच्या नोंदीनुसार तालुक्याचे सध्याचे सरासरी पर्जन्यमान ७६८.६० मिलिमीटर एवढे आहे. गत दोन वर्षे तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे. सध्याही जुलै महिन्यातच पावसाची नोंद सरासरीच्या उंबरठ्यावर असून, आणखी काही दिवस पावसाचा जोर राहिल्यास यंदाही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद तालुक्यात होऊ शकते.

कऱ्हाड तालुक्यात २०१९ आणि २०२० साली सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. २०१९ साली १३२७.५० मिलिमीटर एवढा पाऊस नोंदला गेला असून, गतवर्षीही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यंदाही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद तालुक्यात होण्याची शक्यता आहे.

- चौकट

१६ जूनला विक्रम

कऱ्हाड तालुक्यात १६ जून रोजी रात्री सर्वाधिक पाऊस पडला. केवळ चौदा तासांत तालुक्यात सरासरी ८८.०७ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. दि. १ जूननंतर नोंदलेला हा सर्वाधिक पाऊस असून, यापूर्वीही एका रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नव्हता.

- चौकट

उंब्रज, उंडाळे मंडलात सर्वाधिक

कऱ्हाड उत्तरेतील उंब्रज आणि दक्षिणेतील उंडाळे मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उंब्रज मंडलात आजअखेर एकूण ६७८ मिलिमीटर तर उंडाळे मंडलात ६२३ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

- चौकट

चोवीस तासांत ११.४६ मिलिमीटर पाऊस

गत चोवीस तासांत तालुक्यात सरासरी ११.४६ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून, गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तालुक्यात गेल्या चोवीस तासांत कऱ्हाड मंडलात ११, मलकापूर, सैदापूर, कोपर्डे हवेली मंडलांमध्ये प्रत्येकी १२, मसूर, उंब्रज प्रत्येकी १०, शेणोली ५, कवठे ७, काले १४, कोळे १३, उंडाळेत सर्वाधिक २३, सुपनेत ११ तर इंदोलीत ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

- चौकट

कऱ्हाड तालुक्यातील तेरा मंडलांमध्ये मिळून आजपर्यंत एकूण ६ हजार ९२६ मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

स्वयंचलित पर्जन्यमापक

- चौकट (फोटो : २२ केआरडी ०५)

जूनपासून मंडलनिहाय पाऊस

कऱ्हाड : ६०५.००

मलकापूर : ५९९.००

सैदापूर : ५३८.००

कोपर्डे हवेली : ५१६.००

मसूर : ४२९.००

उंब्रज : ६७८.००

शेणोली : ४४६.००

कवठे : ४५७.००

काले : ५६४.००

कोळे : ५९२.००

उंडाळे : ६२३.००

सुपने : ५६७.००

इंदोली : ३१२.००

(सर्व आकडेवारी मिलिमीटरमध्ये)

- चौकट

दहा वर्षांतील पाऊस

२०१० : ८७२.०८

२०११ : ५९३.०६

२०१२ : ५५०.०६

२०१३ : ५६९.०५

२०१४ : ६६३.०१

२०१५ : ३१७.०४

२०१६ : ६८८.०५

२०१७ : ७५३.९०

२०१८ : ६६६.००

२०१९ : १३२७.५०

२०२० : ९९२.७०

(सर्व आकडेवारी मिलिमीटरमध्ये)

फोटो : २२ केआरडी ०६

कॅप्शन : प्रतिकात्मक

फोटो : २२ केआरडी ०७

कॅप्शन : कऱ्हाड तालुका नकाशा