शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

‘कट’साठी ‘पीआरओं’ची बोली

By admin | Updated: December 1, 2014 00:05 IST

‘रेफरल बुक’चा आधार : महिनाअखेरीस हिशेब करून दिला जातो मोबदला--डॉक्टर, तुम्हीसुद्धा? : ३

सातारा : आलिशान हॉटेल्समध्ये पार्ट्यां अन् मेडिसिन कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून डॉक्टरांना फॉरेन टूर, महागड्या गिफ्टचे गाजर दाखवून रुग्णांना आपल्या अत्याधुनिक रुग्णालयात पाठविण्याचे आणि आपल्या कंपनीची औषधे घेण्यासाठी डॉक्टरांना प्रवृत्त करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. यासाठी काही रुग्णायालयांनी ‘पीआरओ’ची नेमणूक केली असून ते डॉक्टरांना भेटून ‘तुम्ही आम्हाला पेशंट पुरवा, आम्ही तुम्हाला इतरांपेक्षा आकर्षक ‘कट’ देऊ,’ अशी बोली लावतात.मोठ्या रुग्णालयांमध्ये जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) हे पद निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते. आपल्या रुग्णालयातील अत्याधुनिक सोयीसुविधांबद्दल माहिती देणे हा त्यांच्या कामाचा भाग; परंतु याव्यतिरिक्त काही ‘पीआरओ’ मंडळी डॉक्टरांना भेटून ‘तुम्ही आमच्या रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी पाठविले तर आम्ही त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला ‘कट’ देऊ, असे आमिष दाखवितात. डॉक्टरांना महिनाकाठी हजारो रुपये ‘कट’ मिळतो.मोठ्या रुग्णालयातील आधुनिक यंत्रणा, औषधे, डॉक्टरांची संख्या, फर्निचर, रुग्णालयाच्या देखभाल यावर येणारा खर्च प्रचंड मोठा असतो. त्यामुळे साहजिकच अशा रुग्णालयात उपचार पद्धती महागडी असते. आधुनिक रुग्णालयाची उभारणी करताना आलेला खर्च कोट्यवधीत असल्यामुळे गुंतवलेला पैसा परत मिळविण्यासाठी रुग्णालयात रुग्ण येणे आवश्यक असते. ‘पीआरओ’ रुग्णालयाची ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. या गरजेतूनच ‘कट’ हा शब्द तयार झाला आहे. जनरल प्रॅक्टिशनरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आपल्या रुग्णालयाचे नाव सुचवावे, याबदल्यात संबंधित डॉक्टरला ‘टक्केवारी’ दिली जाते. यालाच डॉक्टरांच्या भाषेत ‘कट’ असे म्हटले जाते. एखादे रुग्णालय जास्त ‘कट’ देते म्हणून रुग्णाला तिथे पाठविले जाते. मात्र, अनेकदा त्याठिकाणी रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत. तर काही रुग्णालयात आपल्याकडील औषधे वापरून उपचार खर्च आणि औषधांचे पैसे याचे एकत्रित बिल तयार करून दिले जाते. पैसे मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात घडत असलेले असे गैरप्रकार थाबले पाहिजेत, अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. (लोकमत टीम)‘कट’ नाकारणारेही डॉक्टरआपल्याकडे आलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी किंवा ‘पॅथॉलॉजी’मध्ये तपासणी करण्यासाठी पाठविण्याच्या बदल्यात संबंधित डॉक्टरांना ‘कमिशन’ दिले जाते. मात्र, काही डॉक्टर असेही आहेत की जे ‘कमिशन’ नाकारून त्या बदल्यात रुग्णांना सवलत द्यावी, असे सुचवितात. काही डॉक्टर आपल्या जवळचा रुग्ण असल्याचे सांगून कमी पैशात उपचार करण्याची विनंती करतात.‘रेफरल नोट’च्या माध्यमातून साटेलोटेकाही रुग्णालयाचे व पॅथॉलोजीचे ‘पीआरओ’ आपल्याकडील सोयीसुविधांची माहिती देण्याबरोबरच ‘कट’ची टक्केवारी ठरवून ‘रेफरल बुक’ डॉक्टरांना देतात. डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी किंवा उपचारासाठी ‘रेफरल नोट’वर रुग्णाची माहिती लिहून संबंधित रुग्णालयात किंवा पॅथॉलॉजीत पाठवितात.‘कट प्रॅक्टिस’ हा प्रकार रोखण्यासाठी रुग्णालयांच्या ‘पीआरओं’नी डॉक्टरांना आमिष दाखविणे थांबविले पाहिजे. डॉक्टरांनीही अशा आमिषांना बळी न पडता रुग्णांना कमी खर्चात चांगले उपचार कसे मिळतील हे पाहावे. रुग्णालयातील उपचारपद्धतींची जाहिरात करणे गैर नाही. मात्र, रुग्ण मिळविण्यासाठी कमिशन देऊ करणे योग्य नाही. - डॉ. अमोल आवळेविनाप्रयास हजारोंची कमाई‘रेफरल बुक’च्या माध्यमातून रुग्णांना ठरलेल्या रुग्णालयात पाठविले जाते. त्याबदल्यात संबंधित डॉक्टरांना दहा ते चाळीस टक्क्यांपर्यंत ‘कट’ मिळतो. एक महिन्यात पाठविण्यात आलेल्या रुग्णांची संख्या पाहून महिनाअखेरीस हिशेब होऊन संबंधित डॉक्टरला ‘पाकिट’ पोहोच केले जाते.