शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नव्हे खासगीतही लसीसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:49 IST

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यासह सातारा जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा गतीने सुरू झाला आहे. जिह्यात आतापर्यंत ५ ...

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यासह सातारा जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा गतीने सुरू झाला आहे. जिह्यात आतापर्यंत ५ लाख ८७ हजार ८४६ नागरिकांनी कोरोना लस घेतली असून, यामध्ये ७१ हजार ४३३ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती होऊ लागल्याने आता सरकारीबरोबरच खासगी रुग्णालयांतही लसीकरणासाठी रांगा लागल्या आहेत.

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच दि. १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला आहे. शासनाने जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांत लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

प्रारंभी ज्या नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी केली होती, अशा नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस दिली जात होती. आता आधारकार्ड सोबत घेऊन येणाऱ्या कोमॉर्बिड व साठ वर्षांवरील व्यक्तीची लसीकरण केंद्रावर नोंदणी करून तातडीने लसही दिली जात आहे. सरकारी रुग्णालयांत ही लस मोफत असली तरी खासगी रुग्णालयांत मात्र लसीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जात आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ८७ हजार ८४६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५ लाख १६ हजार ४१३ नागरिकांनी पहिला, तर ७१ हजार ४३३ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

ज्या नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे, अशा एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. त्यामुळे नागरिक लसीकरणाला प्राधान्य देऊ लागले आहेत. शासकीय रुग्णालयात लसीचा तुटवडा भासू लागल्याने आता नागरिक खासगी रुग्णालयातही रांगा लावून लस घेत आहेत.

(चौकट)

पालिकेच्या रुग्णालयांनाही प्रतिसाद

सातारा पालिकेकडून कस्तुरबा रुग्णालय व गोडोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करण्यात आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ११ हजार ३८२, तर गोडोली आरोग्य केंद्रात ११ हजार ९९१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या दोन्ही केंद्रांवर दररोज सरासरी पाचशे नागरिकांना लस टोचली जात आहे.

(पॉइंटर)

लसीकरणाचा लेखाजोखा

एकूण लसीकरण : ५,८७,८४६

पहिला डोस : ५,१६,४१३

६० वर्षांवरील : २,३०,२९१

४५ वर्षांवरील : २,३८,२९१

१८ ते ३० वर्षांवरील फ्रंटलाइन वर्कर : १२,४७६

फोटो : जावेद खान