शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

सातारा विसर्जन तळ्याचा प्रश्न जलमंदिरच्या कोर्टात-गणेश मंडळांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 19:54 IST

शहराच्या पश्चिम भागात असणारे ऐतिहासिक मंगळवार व मोती तळे गणपती विसर्जनासाठी योग्य असून, या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनास परवानगी मिळण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक कल्पनाराजे भोसले यांची

ठळक मुद्देसातारा पालिकेत , सर्वपक्षीय समिती घेणार कल्पनाराजेंची भेट

सातारा : शहराच्या पश्चिम भागात असणारे ऐतिहासिक मंगळवार व मोती तळे गणपती विसर्जनासाठी योग्य असून, या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनास परवानगी मिळण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक कल्पनाराजे भोसले यांची भेट घेणार आहेत.

सातारा नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, नगरसेवक व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या बैठकीत विसर्जन तळे आणि वाहतूक मार्ग यावर साधारण दीड तास चर्चा झाली.

भाजपचे नगरसेवक विजय काटवटे यांनी माहिती अधिकाराच्या नावाखाली देवतांना वेठीस धरून सातारा शहराची अनेक वर्षांची परंपरा खंडित करणाऱ्यांवर टीकेची झोड उडवली. सिद्धी पवार यांनी मोती तळ्याचे वाटोळे झाले आहे. येत्या दहा दिवसांत तळी स्वच्छतेचा काय आकृतीबंध असणार आहे, याचा खुलासा मुख्याधिकाºयांनी करण्याची मागणी केली. शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे व प्राची शहाणे यांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक तर एक खिडकी योजनेचे सुलभीकरण हे दोन मुद्दे मांडले.

माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गवळी यांनी सातारा गणेशोत्सवाचे पालकत्व घेणारी सातारा पालिका मध्यवर्ती गणेशोत्सवाची स्त्युत्य संकल्पना विसरल्याची खंत व्यक्त केली. मिरवणूक तसेच विसर्जन मिरवणुकांची कायमस्वरूपी व्यवस्था होण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सप्ततारा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू गोडसे यांनी गोडोली तळ्यात मूर्ती विसर्जनास विरोध दर्शवत कृत्रिम तळे निर्माण करण्यापेक्षा कायमस्वरूपी तळे निर्माण करण्याचा आग्रह धरला. माजी विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बाबर यांनी मंगळवार व मोती तळ्यांची स्वच्छता पाच लाखांत होते. तेथे विसर्जनास सातारकरांची काहीच तक्रार नाही. सातारा पालिकेने हा प्रश्न आपल्या पातळीवर सोडवावा, अशी विनंती केली.

अखेर नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कमिटी नेमून येत्या आठ दिवसांत तळ्याचा निर्णय अंतिम करणे, मंगळवार तळेच्या अंतिम परवानगीसाठी कल्पनाराजे भोसले यांची भेट घेणे अशी सूचना विरोधी पक्षनेते अशोक मोने व स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी केली व त्याला सभागृहाने एकमताने मान्यता दिली.बाप्पा मोरयाचा जयघोषसातारा शहरातील गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. यंदा कृत्रिम तळ्यास जागा देण्यासाठी जिल्हा परिषदेने परवानगी नाकारल्यानंतर सातारकरांपुढे विसर्जनाचा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत पालिका प्रशासन, नगरसेवक व गणेश मंडळांमध्ये मंगळवार तळ्यावर एकमत झाल्याने सर्वांनी बाप्पा मोरयाच्या गजराने सभागृह दणाणले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGanpati Utsavगणपती उत्सव