शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

महामार्गाच्या गुणवत्तेची लक्तरं बारदानात!

By admin | Updated: April 29, 2016 00:21 IST

सहापदरीकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह : कामातील ‘चुकांवर पांघरुण’ घालण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा केविलवाणा प्रयत्न

राहुल तांबोळी -- भुर्इंजगरज नसताना सुरु असलेले महामागाचे सहापदरीकरण. अधिकाऱ्यांची मनमानी. कामातील ठासळलेली गुणवत्ता. नियोजनाचा अभाव अन् वाढते अपघात... यामुळे अगोदरच नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यातच बुधवारी भुर्इंज येथे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला त्यामुळे पुन्हा एकदा महामार्ग प्राधिकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उड्डाणपूल उभारणीत घडलेल्या या अक्षम्य चुकीवर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत महामार्ग प्राधिकरणाने कोसळलेला पूल चक्क बारदानात गुंडाळून ठेवला.बुधवारी (दि.२७) रात्री आठ वाजता कामगार जेवायला गेले असताना उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला. त्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुरुवारी सकाळी लवकर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले. अधिकारी म्हणतात, ‘काहीच कल्पना नाही!’भुर्इंज येथील दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बिजेंद्र नावाचे अधिकारी यांनी आपणास काहीच कल्पना नाही, असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकली. तसेच इतर जबाबदार अधिकारी, सुपरवायझर यांनीही घटनास्थळी थांबण्याचे औदार्य दाखवले नाही. गावातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी या घटनेबाबत संवाद साधला नाही. या दुर्घटनेचे कारण स्पष्ट केले नाही. याबाबतही अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळी गजानन भोसले, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश शिंदे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर भोसले-पाटील, भाऊसाहेब जाधवराव, मधुकर भोसले, किरण शिंदे, नारायण नलवडे, प्रतापराव जाधवराव, भाऊसाहेब शिंदे, शेषा भोसले उपस्थित होते. संयुक्त बैठक बोलावणारया दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स कंपनी, प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व दर्जा देखरेख समिती यांची संयुक्त बैठक बोलावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले. महामार्ग सहापदीरकणाचे काम वेळेत पूर्ण होण्याबरोबरच उत्तम दर्जाचे आणि अपघाताविना होणे आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिस विभागाची जी जबाबदारी असेल, ती बजावली जाईल, असा शब्द त्यांनी दिला.