शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधी लावतायत वणवा.. मग वृक्षांवर घाला ! अजिंक्यतारा होतोय बोडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:56 IST

जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत

ठळक मुद्देवनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर; पर्यावरणप्रेमी संतप्त

सातारा : जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. येथील वनसंपदा हीच किल्ल्याची खरी संपत्ती आहे. साग, चंदन, शिवर, धायटी, सुबाभूळ, कडुलिंब, नीलगिरी यासह विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आजही येथे आढळतात. परंतु अलीकडे या वृक्षांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे.

डोंगराच्या पायथ्याशी रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक नागरिक किल्ल्यावरील वृक्षांचा उपयोग इंधन म्हणून करीत आहे. यासाठी छोट्या-मोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. एकीकडे वणव्यात वृक्षांची होरपळ सुरू असताना आता वृक्षतोडीच्या घटनांतही वाढ होऊ लागल्याने गर्द वनराईने नटलेला अजिंक्यतारा किल्ला बोडका होऊ लागला आहे. किल्ल्यावर आतापर्यंत विविध सामाजिक संस्था व नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या हिमतीने या झाडांचे संवर्धन केले. परंतु वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोडीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. किल्ल्यावरील या वनसंपदेचे जतन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने ठोस पावले उचलण्यात यावीता, अशी मागणी नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.वृक्षतोडीचा नवा फंडा चर्चेचा विषयजे वृक्ष सुकलेले आहेत अथवा पडण्याच्या मार्गावर आहेत, असे वृक्ष नागरिकांकडून तोडले जातात. परंतु हिरव्यागार वृक्षांवरही घाला घातला जातो. हिरव्यागार झाडांच्या फांद्या तोडून त्या जागेवरच टाकल्या जातात. काही दिवसांनंतर त्या सुकल्या की त्याची मोळी बांधून नेली जाते. वृक्षतोडीचा हा नवा फंडा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्षतोडीच्या घटना वाढल्या आहेत. काही वर्षांपूर्वी हिरवागार दिसणारा हा किल्ला आता वृक्षांअभावी ओसाड दिसू लागला आहे. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी.- अजित इथापे, नागरिक

टॅग्स :forestजंगलroad safetyरस्ते सुरक्षा