शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

पुरुषोत्तम जाधव स्वगृही परतणार?

By admin | Updated: June 13, 2016 00:19 IST

कार्यकर्ते प्रतीक्षेत : सेनेचं वादळ झंझावात करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न

खंडाळा : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रस्थापितांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी कडवट शिवसैनिकांची मजबूत फळीही तितकीच सक्षम असल्याने शिवसेनेने आपले अस्तित्व अबाधित ठेवले आहे. वास्तविक शिवसेनेला जिल्ह्यात गावोगावी पोहोचविणारे आणि निस्वार्थीपणे कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष मजबूत करणारे जिल्ह्याचे नेते पुरुषोत्तम जाधव हे सध्या सेनेच्या बाहेर आहेत. पुढील राजकारणाची दिशा जिल्ह्याला भगवामय करण्यासाठी सेना अधिक प्रबळ होणे गरजेचे आहे. त्यासाठी सेनेचं वादळ झंझावात करण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी स्वगृही परतावे, अशी आर्त हाक शिवसैनिकांमधून दिली जात आहे. सध्या जिल्ह्यात होणारी ही चर्चा पुरुषोत्तम जाधव पुन्हा सेनेच्या मार्गावर असल्याचे मानले जात आहे.लोकसभा निवडणूक अपक्ष लढविल्यानंतर स्वाभिमान जागृत ठेवत दोन वर्षांपूर्वी भाजपाची वाट धरणाऱ्या पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्व कौशल्याची म्हणावी तशी दखल भाजपातही घेतली गेली नाही. तरीही जनसंपर्क कायम राहिल्याने कार्यकर्त्यांचे मोहोळ आजही बरोबर राहिले आहे. मूळच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी पुरुषोत्तम जाधव तुम्ही फिरा ! अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत.वास्तविक एका सामान्य कुटुंबातून येऊन जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी ठसा उमटविल्याने सर्वसामान्य नेतृत्व म्हणून जाधवांकडे पाहिले जाते. शिवसैनिकांची आर्त हाक असली तरी सेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना जाधव पुन्हा सेनेत आल्याचे चालणार का? याविषयी सध्या चर्चा आहेत. मात्र, जाधवांच्या एन्ट्रीने शिवसेनेत पुन्हा चैतन्य येईल ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.पुरुषोत्तम जाधव यांना पुन्हा सेनेत घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र, त्यांना योग्य पद देऊन तोच सन्मान राखला जाणार का याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. याविषयी जाधवांशी संपर्क साधला असता योग्यवेळी निर्णय घेऊ, अशी सूचक प्रतिक्रिया मिळाली. मात्र, ती योग्य वेळ कधी हे पाहणे उत्सुकतेचे आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी हा निर्णय झाल्यास शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष जाधवांच्या भूमिकेकडे आहे. (प्रतिनिधी)खासगीत बैठकभाजपामधून विधानसभा लढविणारे पुरुषोत्तम जाधव यांना शिवसेनेत घेण्याबाबत गतीने हालचाल सुरू आहेत. याबाबत शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील व पुरुषोत्तम जाधव यांची खासगीत बैठक झाली असल्याची चर्चा आहे.