शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पुण्याचा सिंहगड संघ सेवागिरी चषकाचा मानकरी-राज्यातील नामवंत ४२ संघांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:07 IST

श्री सेवागिरी चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सडोली (कोल्हापूर)च्या छावा कब्बड्डी संघाने पुण्याच्या सिंहगड कबड्डी संघाचा पराभव करून ५१ हजारांच्या बक्षिसासह

ठळक मुद्देराज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

 पुसेगाव : श्री सेवागिरी चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सडोली (कोल्हापूर)च्या छावा कब्बड्डी संघाने पुण्याच्या सिंहगड कबड्डी संघाचा पराभव करून ५१ हजारांच्या बक्षिसासह सेवागिरी चषक पटकावला. स्पर्धेत नामवंत ४२ संघांनी सहभाग घेतला होता.

येथील शासकीय विद्यानिकेतनलगतच्या यात्रास्थळावर चार मैदानांवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात आल्या. छावा कब्बडी संघ सडोली (प्रथम) सिंहगड कब्बडी संघ, पुणे (द्वितीय क्रमांक), शाहू कबड्डी संघ सडोली कोल्हापूर (तृतीय क्रमांक) तर कोल्हापूरच्या नवभारत कबड्डी संघाला चतुर्थ क्रमाकांचे बक्षीस मिळाले.

याशिवाय वैयक्तिक बक्षीस अंतर्गत अष्टपैलू खेळाडू-हृषीकेश गावडे, उत्कृष्ट चढाई-ज्ञानेश्वर पवार, उत्कृष्ट पकड-रुपेश थोरात, मॅन आॅफ द मॅच - शरद पवार याशिवाय उत्कृष्ट उजवा मध्यरक्षक, उत्कृष्ट डावा मध्यरक्षक, उत्कृष्ट उजवा कोपरा, उत्कृष्ट डावा कोपरा यांना रोख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी कब्बडी खेळाडू शकुंतला खटावकर, नीलिमा कदम, वैभवराजे घाडगे, रोहित पवार, प्रा. उत्तमराव माने, संग्रामजित उथळे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सुरेश जाधव, मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, प्रताप जाधव, सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना मदनशेठ जाधव, अरुण मदने यांच्या हस्ते सेवागिरी चषकासह बक्षीस वितरण करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKabaddiकबड्डी