शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

म्हैसाळ थकबाकीप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका

By admin | Updated: October 11, 2015 00:13 IST

राष्ट्रवादीचा निर्णय : थकबाकी माफ न झाल्यास आंदोलन

मिरज : म्हैसाळच्या थकबाकीचा बोजा शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. टेंभू योजना कृती समितीचे अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी म्हैसाळची थकबाकी माफ करावी, यासाठी जनआंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. अ‍ॅड. मुळीक म्हणाले, जिल्ह्याच्या दुष्काळी भागात टेंभू, ताकारी, म्हैसाळ या जलसिंचन योजना सुरु ठेवण्यासाठी वीजबिल ही समस्या आहे. योजनांना कायमस्वरुपी विद्युतपुरवठा सुरु राहण्यासाठी दुष्काळी भागात पवन व सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा किंवा ठराव करण्यात येतील. पवन व सौर ऊर्जेमुळे टेंभू ताकारी व म्हैसाळ योजना कायम सुरु राहणार असल्याचे अ‍ॅड. मुळीक यांनी सांगितले. बाळासाहेब होनमोरे यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन नसताना चाचणीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेल्या पाणीबिलाची आकारणी चुकीची आहे. पाणीबिलाची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर कर्ज म्हणून नोंद करणे अन्यायी आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलन व उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे होनमोरे यांनी सांगितले. चुकीची पाणीपट्टी आकारणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटलेही दाखल करण्यात येणार असल्याचे होनमोरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, तानाजी दळवी, गंगाधर तोडकर उपस्थित होते. (वार्ताहर)