शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद, शिवीगाळ व दमदाटीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 14:13 IST

सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाच्या निषेधार्थ पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घंटागाडी चालक-मालक सहभागी झाल्याने शहरातील कचरा उचलला गेला नाही.

ठळक मुद्देसातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद नगरसेवकाने केलेल्या शिवीगाळ व दमदाटीचा निषेध

सातारा : सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाच्या निषेधार्थ पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घंटागाडी चालक-मालक सहभागी झाल्याने शहरातील कचरा उचलला गेला नाही.सदर बझार परिसरात एक डुक्कर मृत अवस्थेत आढळून आले होते. प्रभागातील काही नागरिकांकडून याची माहिती नगरसेवक विशाल जाधव यांना मिळताच शुक्रवारी रात्री त्यांनी पालिकेचे मुकादम दिलीप सकटे यांना फोन करून ते जनावर तातडीने उचलण्याची सूचना केली होती. मात्र, घंटागाडी पंक्चर झाल्याने सकटे त्याठिकाणी गेले नव्हते.शनिवारी दुसऱ्या दिवशी सकटे सदर बझार येथील हजेरी कार्यालयात कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असताना नगरसेवक विशाल जाधव यांनी त्याठिकाणी येऊन सकटे यांनी दमदाटी व शिवीगाळ केली होती. तसेच बायोमेट्रिक मशीनची तोडफोडही केली होती.

या घटनेच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी विशाल जाधव यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या घटनेला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी अखिल महाराष्ट्र कर्मचारी संघाच्या वतीने कामबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.

त्यानुसार सोमवारी आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी व घंटागाडी चालक-मालकांच्या वतीने घंटागाड्या बंद ठेवून कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सकाळी कोणत्याही प्रभागातील कचरा संकलित होऊ शकला नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर