शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंसेला विरोध करण्यासाठी साताऱ्यात भरपावसात मोर्चा

By admin | Updated: July 17, 2017 00:05 IST

हिंसेला विरोध करण्यासाठीसाताऱ्यात भरपावसात मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जाती, धर्माच्या नावाखाली समाजात हिंसा पसरवली जात आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरही हल्ला करण्यात आला. वाढत्या हिंसाचाराला विरोध करण्यासाठी साताऱ्यात रविवारी दुपारी भरपावसात मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक घोषणांनी सातारा शहर दुमदुमून गेला.राजवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा मोती चौक, पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कल परिसरात आला. यावेळी सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई हम सब भाई-भाई,’ अशी उद्घोषणा मोर्चाच्या अग्रभागी करण्यात येत होती. ‘नॉट इन माय नेम’ लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी डोक्यावर घातल्या होत्या. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणारे फलक हातात धरले होते. यामध्ये ‘अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा धिक्कार असो’, ‘लोकशाही हवी, ‘झुंडशाही नको’, ‘मी दुखी आहे, मी असुरक्षित आहे,’ ‘आमचा हिंसेला ठाम विरोध आहे’ आदी फलक हातात धरले होते. मोर्चा शहरातून जात असतानाच असंख्य सातारकर मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत होते. मोर्चात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम, पतंगराव फाळके, विविध कॉलेजमधील युवक-युवती, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते, मुक्तिवादी संघटना, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे, विमा कामगार संघटना, सर्व श्रमिक संघटना, जनवादी महिला सभा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारिप बहुजन महासंघ, मुस्लीम जागृती अभियान, सातारा एजुकेशन आणि कल्चरल सोसायटी, खिदमतगाह ज्येष्ठ नागरिक संस्था, मुस्लीम मॅरेज ब्युरो कमिटी आदी सामाजिक संघटनांचा सहभाग होता. महिला, तरुणीही सहभागीसाताऱ्यातील शांतताप्रिय नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. साताऱ्यात सकाळी चांगला पाऊस पडत असतानाही असंख्य महिला, तरुणी रेनकोट घालून तर काही छत्री घेऊन या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. हिंसेला विरोध करण्याची शपथशेवटी शाहीर शीतल साठे यांनी जमलेल्या सर्व नागरिकांना शपथ दिली. कुठल्याही सामूहिक हिंसाचाराचा मूक साक्षीदार अथवा भागीदार न बनण्याची व हिंसेला विरोध करण्याची ही प्रतिज्ञा होती. यानंतर मोर्चाची सांगता झाली. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले.