सातारा : सातारा बंधारे विभागात अधीक्षक अभियंतापदी काम केलेले विजय घोगरे यांना औरंगाबाद जलसंपदा विभागात मुख्य अभियंतापदी पदोन्नती मिळाली असून, त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
सातारा, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी काम पाहिले. सातारा जिल्ह्यात विविध धरण प्रकल्पांची कामे व धरणग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणारे आणि धरणग्रस्तांच्या जिवाभावाचा माणूस अशी ओळख असलेले विजय घोगरे हे मूळचे इंदापूर तालुक्यातील बावडा वकील वस्ती गावचे आहेत. जळगाव येथून त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात केली. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेते काम पाहतात. नुकतीच त्यांना पदोन्नती मिळाली. राज्य शासनाचे सचिव प्रशांत साजणीकर यांच्या आदेशानुसार औरंगाबाद जलसंपदा विभागात मुख्य अभियंतापदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. औरंगाबाद जलसंपदा विभागामध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश होतो.
फोटो आहे...