शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

दबाव झुगारून प्लास्टिक बंदी !

By admin | Updated: November 15, 2015 01:04 IST

महाबळेश्वर पालिकेची जोरदार मोहीम : व्यापाऱ्यांच्या हाती दिसू लागल्या कापडी पिशव्या

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी केल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर काही लोकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु या सर्व दबावावर मात करून ही मोहीम सुरू ठेवली आहे. मुख्याधिकारी सचिन पवार यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे महाबळेश्वरने प्लास्टिक मुक्तीकडे वाटचार सुरू केली आहे. ही मोहीम पालिकेने अशीच चालू ठेवली तर लवकरच महाबळेश्वर हे प्लास्टिकमुक्त होईल, असा विश्वास पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. प्लास्टिक बंदीच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने चार पथके तयार केली असून, या पथकांनी रोज शहरात धाडी टाकून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग जप्त करण्याचा धडाका लावला आहे. शहरातील व्यापारी कॅरिबॅग ठेवणे बंद केले आहे. अनेक व्यापारी स्वत:हून या मोहिमेत सहभाग होत आहे. प्लास्टिक पिशव्यांऐवजी आता अनेक व्यापाऱ्यांकडे कापडी व कागदी पिशव्या दिसू लागल्या आहेत. प्लास्टिक कॅरिबॅगचे निसर्गावर होणारे दुरगामी परिणाम लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली; परंतु महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवदेनशील असूनही येथे प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. पालिका प्लास्टिक बंदीबाबत विविध प्रकारचे ठराव करीत होती. विविध उपक्रम सुरू करीत करून प्लास्टिक बंदीबाबत आम्ही किती जागरुक आहोत, याचा देखावा केला जात होता. गेली अनेक वर्षे हेच घडत होते. त्यामुळे महाबळेश्वरच्या चोहो बाजूंनी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जमा होत होता. गेल्या महिन्यात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे हे महाबळेश्वर भेटीवर आले असता त्यांनी महाबळेश्वरमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वारेमाप वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांना धारेवर धरले. विविध खात्यांच्या प्रमुख अधिकारी यांची हिरडा विश्रामगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रधान सचिव यांनी १ नोव्हेंबर पासून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशच पालिकेला दिले होते. प्रधान सचिव यांनी आदेश देताच पालिका कामाला लागली. यानंतर पालिकेने शहरतील सर्व प्रकारचे व्यापारी यांची माहिती गोळा केली. वर्तमानपत्रातून प्रसिद्धी बैठका घेतल्या तसेच सर्वांना ‘एसएमएस’द्वारे प्लास्टिकबंदीबाबत माहिती दिली. अंमलबाजवणीसाठी चार पथके तयार केली. प्रत्यक्ष अंमलबजावणी पाच नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली व चार दिवस जप्तीचा धडाका लावण्यात आला. जप्त केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा खच जमा होऊ लागला असून, अनेक व्यापाऱ्यांनी कापडी पिशव्यांचा वापर सुरु केला आहे. (प्रतिनिधी)  

महाबळेश्वर पालिकेने प्लास्टिक विरोधी मोहिम हाती घेतली असून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास प्रारंभ केला आहे. एक आठवडा हा फक्त जप्तीसाठी ठेवण्यात आला आहे. जे व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना आढळतील अशा व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल - सचिन पवार, मुख्याधिकारी