शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोळेकरवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:44 IST

चाफळ : चाफळ विभागातील कोळेकरवाडी या डोंगरपठारावर दुर्गम भागात वसलेल्या गावाला रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत ...

चाफळ : चाफळ विभागातील कोळेकरवाडी या डोंगरपठारावर दुर्गम भागात वसलेल्या गावाला रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कोळेकरवाडीकरांची रस्त्याची ही गैरसोय दूर करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी विशेष पाठपुरावा करीत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी वनविभागाच्या मान्यतेसह आवश्यक असणारा ८८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करणार आहे,’ अशी ग्वाही देसाईंनी दिली.

दरम्यान, बांधकाम विभागाचे ए. एम. जाधव, एस. आर. भोसले, मल्हारपेठ वनपाल एस. बी. भट, वनरक्षक विलास वाघमारे व अधिकाऱ्यांनी शिंगणवाडी ते कोळेकरवाडी या दोन किलोमीटर ३५० मीटर रस्त्यापैकी वन हद्दीत येणाऱ्या १ किलोमीटर ६५० मीटर रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण केल्याने कोळेकरवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

चाफळ विभागातील कोळेकरवाडी व वनवासवाडी या डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावांना रस्त्याची सुविधा नाही. याबाबत ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर प्रश्न मांडले होते. मंत्री शंभूराज देसाई यांनी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एन. एम. वेदफाटक, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. टी. भोसले, तत्कालीन वनाधिकारी विलास काळे व उपअभियंता आर. एस. भंडारे यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेत या रस्त्याच्या कामास वनविभागाची मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यासंदर्भात सुचित केले होते.

या बैठकीत ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिंगणवाडी ते कोळेकरवाडी पोहोच रस्ता करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या रस्त्याअंतर्गत १२० मीटर क्षेत्र शिंगणवाडी ग्रामपंचायत हद्दीतील आहे. पुढील आठशे मीटर लांबीचे क्षेत्र वनविभागातील आहे; तर उर्वरित सुमारे चारशे मीटर लांबीचे क्षेत्र डेरवण ग्रामपंचायत हद्दीतील आहे. रस्त्याची एकूण लांबी १ हजार ३२० मीटर असून, रुंदी साडेसात मीटर आहे. त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, यासाठी सुमारे ८७ लाख ७७ हजार रुपये निधीची गरज आहे. प्रथमत: या रस्त्याच्या कामांकरिता आठशे मीटर वनविभागाच्या लांबी क्षेत्रास मान्यता देऊन आवश्यक असणारा ८८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. त्याप्रमाणे वनविभाग व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे.