शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील प्रचारात; उमेदवारीचं ठरलं तेव्हा पाहूची भूमिका 

By नितीन काळेल | Updated: March 26, 2024 18:19 IST

लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती..

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नसला तरी ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील नेते विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात करणार आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार श्रीनिवास पाटीलही सहभागी होणार आहेत. यामुळे आघाडीने प्रचाराची रणनीतीच ठरविल्याचे स्पष्ट होत आहे.लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होऊन १० दिवस उलटून गेले आहेत. तरीही सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडी तसेच महायुतीचाही उमेदवार ठरलेला नाही. आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे मतदारसंघ आहे. तर युतीत भाजप की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मतदारसंघ मिळणार हे स्पष्ट नाही. त्यातच दोन्ही पक्षाकडूनही मतदारसंघ मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. महायुतीचा उमेदवार कोण असणार यावरच शरद पवार यांचाही उमेदवार ठरणार हे स्पष्ट होत आहे. तरीही प्रचारात आपण मागे राहायला नको, उमेदवार कोणी का असेना आपण एकसंध आहोत, हे दाखविण्याच्या प्रयत्नात आघाडीतील नेते आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह आघाडीचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या मेळाव्यातून नेते हे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी केल्याचेही स्पष्ट होत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती..सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची जिल्हा समन्वय समिती तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये आघाडीतील प्रमुख तीन राजकीय पक्षांचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, छोटे पक्ष व सामाजिक संघटनांचा एक असे मिळून सहा प्रतिनिधी आहेत. म्हणजे या समितीत १५ जण आहेत. त्याचबरोबर प्रत्येक तालुकानिहायही समन्वय समिती तयार करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाShrinivas Patilश्रीनिवास पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण