शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शाडूच्या गणेशमूर्तींना प्राधान्य द्या, रवी पवार यांचे मूर्ती कारागिरांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:51 IST

गणेशोत्सव प्रदूषणमुक्त पार पाडण्यासाठी कारागिरांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती न बनविता शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. मूर्ती घडविताना तिची उंची पाच फुटांपेक्षा अधिक करू नये, अशा सूचना नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी कारागिरांना केल्या.

ठळक मुद्देशाडूच्या गणेशमूर्तींना प्राधान्य द्या, रवी पवार यांचे मूर्ती कारागिरांना आवाहनपाच फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती बनवू नये

सातारा : गणेशोत्सव प्रदूषणमुक्त पार पाडण्यासाठी कारागिरांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती न बनविता शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. मूर्ती घडविताना तिची उंची पाच फुटांपेक्षा अधिक करू नये, अशा सूचना नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी कारागिरांना केल्या.सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी गणेशमूर्ती कारागिरांची बैठक नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, विरोधी पक्ष नेता अशोक मोने, नगरसेवक राजू भोसले, सुजाता राजेमहाडिक, सुजाता गिरीगोसावी, नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.रवी पवार म्हणाले, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होत नाही. त्यामुळे जलस्त्रोत प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेश मूर्तीची उंची अधिक असल्याने विसर्जनासाठी अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कारागिरांनी यंदा शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे.नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, सण, उत्सव साजरे करताना पर्यावरण व प्रदूषणाचा विचारही करायला हवा. विसर्जन तळ्याचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. यावेळी तळ्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, परपप्रांतीय कारागिरांमुळे आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यांच्याकडून प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या मूर्ती घडविल्या जातात. अशा कारागिरांवर पालिकेने प्रथम बंदी घालावी, अशी मागणी यावेळी उपस्थित कारागिरांनी केली.तळ्यासाठी पालिका न्यायालयात जाणारसातारा शहरात मूर्ती विसर्जनासाठी काही पारंपरिक तळी उपलब्ध असताना कृत्रिम तळ्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. पारंपरिक तळ्यात मूर्ती विसर्जन झाल्यास हा खर्च वाचू शकतो. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी पारंपरिक तळ्यांना परवानगी देण्यात यावी, यासाठी पालिकेकडून पुन्हा एकदा न्यायालयात पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी दिली.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSatara areaसातारा परिसर