शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

चव्हाणवाडीत प्रेयसीच्या आतेभावाचा खून

By admin | Updated: November 6, 2015 23:36 IST

आरोपी स्वत:च पोलीस ठाण्यात दाखल

सणबूर : चव्हाणवाडी-धामणी (ता. पाटण) येथील युवकाने प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या आतेभावाचा खून केला. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या कपड्यांसह स्वत:च ढेबेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अजित आनंदा देसाई (रा. पापर्डे, ता. पाटण) असे खून झालेल्याचे नाव असून, राहुल रामचंद्र जाधव (रा. चव्हाणवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडीतील राहुल जाधव हा युवक गावातीलच एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याची एका युवतीशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित युवती व राहुल मोबाइलवर एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, युवतीच्या मैत्रिणीने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. मैत्रिणीच्या वडिलांनी ही माहिती युवतीच्या वडिलांना दिली. त्यामुळे युवतीच्या वडिलांनी तिच्या आत्याचा मुलगा राहुल जाधव याला घरी बोलावून घेतले. सर्व प्रकार त्यांनी त्याला सांगितला. त्यामुळे राहुलसह त्या युवतीचे वडील व चुलतभाऊ राहुलला मारहाण करण्यासाठी त्याचा शोध घेत होते. हा प्रकार समजल्यानंतर घाबरलेला राहुल त्याच्या शेतातील एका गंजीचा आडोसा घेऊन लपून बसला. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच ठिकाणी झोपत होता. गुरूवारी सकाळी संबंधित मुलगी व तिची मैत्रिण अजितच्या दुचाकीवरून कॉलेजला गेल्याचे राहुलने पाहिले होते. त्यामुळे तो चिडला होती. तसेच अजित आपल्याला मारहाण करेल, याचीही त्याला भीती होती. शुक्रवारी सकाळी अजित युवतीला महाविद्यालयात सोडून दुचाकीवरून एकटाच परत येत होता. त्यावेळी आडोशाला लपून बसलेल्या राहुलने अचानक अजितवर हल्ला चढविला. त्याने त्याला दांडक्याने मारहाण केली. तसेच मोठा दगड उचलून तो दोन ते तीन वेळा त्याच्या डोक्यात घातला. त्यामुळे अजितचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळानंतर राहुल स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसांत झाली आहे. पोलीस उपअधीक्षक नीता पडवी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक चौखंडे तपास करीत आहेत. (वार्ताहर) मोबाइल फोडून विहिरीत फेकला अजितचा खून केल्यानंतर राहुलने त्याची दुचाकी शेतात टाकली. त्यानंतर तो शेतातील पायवाटेवरून चालत एका विहिरीजवळ आला. तेथे स्वत:चा मोबाइल फोडून त्याने तो विहिरीत फेकून दिला. कपड्यांवरील रक्ताचे डाग कोणाला दिसू नयेत, यासाठी टॉवेल अंगावर घेऊन तो पोलीस ठाण्याच्या दिशेने गेल्याचे तपासात उघड झाले आहे.