शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

‘प्रतापगड’मध्ये मनमानी ‘शिंदे’शाही!

By admin | Updated: September 21, 2015 23:57 IST

बचाव समितीची टीका : संचालकांनी दिला सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा

कुडाळ : प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत योगदान देऊन तसेच राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहूनही केवळ दोन शिंदेंच्या वादात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष व कारखान्याचे विद्यमान संचालक तानाजी शिर्के यांचा राजकीय सूडबुद्धीने विद्यमान चेअरमन सुनेत्रा शिंदे यांनी राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे शिर्के यांच्याबरोबर आम्हीही बचाव समितीचे सात संचालक यापुढे त्यांच्या मनमानीला विरोध करु अथवा राजीनामे देवू, त्यांनीही १४ संचालकांचे राजीनामे घेऊन पुन्हा निवडणुकीस सामोरे जावे, असा इशारा बचाव समितीचे संचालकांनी आज पत्रकार परिषदेत दिला.प्रतापगड कारखाना निवडणुकीत एकमेव निवडणुकीस सामोरे जावून निवडून आलेल्या तानाजी शिर्के यांच्या संचालकपदाच्या राजीनामा मंजुरीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. तर त्यानिमित्ताने आमदार शशिकांत शिंदे यांचा तालुक्यातील राजकीय गोष्टींमध्ये कसा हस्तक्षेप चालू आहे हेदेखील यानिमित्ताने समोर आहे. विद्यमान चेअरमन सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच सात संचालकांनी वाचला.यावेळी तानाजी शिर्के म्हणाले, विद्यमान चेअरमन पुण्यातून राजकारण करताना आपल्याभोवती जो गोतावळा जमवला आहे त्यांचेच काम करीत आहेत. त्यांच्या चुकीच्या राजकारणामुळेच त्यांना कुडाळ ग्रामपंचायतीची सत्ता मिळवता आली नाही. कारखाना अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी मी. आ. शिंदेशी चर्चा करुन निर्णय घ्या, असं सांगितले असे सांगून शिर्के म्हणाले, या मायलेकरांचा दगडाखालून हात निसटल्याने त्यांनी आ. शिंदे यांनाही कोलदांडा लावला.तर यावेळी बचाव समितीचे निमंत्रक व विद्यमान संचालक मालोजीराव शिंदे म्हणाले, आम्ही सात संचालक आमदार शिंदेंमुळे नव्हे तर बचाव समितीने वेळोवेळी घेतलेल्या योग्य भूमिकेमुळे कारखान्यावर निवडून गेलो आहोत. तर आमदार शिंदे यांच्याच राजकीय खेळीमुळे तानाजी शिर्के यांचा राजीनामा मंजूर केला गेला आहे. त्यामुळे आ. शिंदे हे तालुक्याच्या राजकारणात हस्तक्षेप करुन फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप मालोजी शिंदे यांनी यावेळी केला तर आम्ही सातजण एकत्र राहून चेअरमन शिंदे यांच्या मनमानीवर अंकुश ठेवणार.पत्रकार परिषदेस कारखाना संचालक प्रकाश भोसले, प्रदीप तरडे, संजय निकम, रामदास पार्टे, तानाजी शिर्के, मालोजी शिंदे, सभापती सुहास गिरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हिम्मत असेल तर निवडून येवून दाखवापुण्यात राहून प्रतापगड कारखाना चालवणाऱ्या अध्यक्षा सुनेत्रा शिंदे, पुत्र सौरभ शिंदे यांनी माझ्यासारखा राजीनामा देण्याचे धाडस दाखवून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवावे व निवडून येवून दाखवून आपले नेतृत्व सिद्ध करावे, असे सरळ आव्हानच संचालक तानाजी शिर्के यांनी सुनेत्रा शिंदे, सौरभ यांना यावेळी दिले.