शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

‘शब्दप्रभू’चा प्रसाद दुर्बलांना!

By admin | Updated: October 1, 2015 00:29 IST

छंद शब्दकोड्यांचा : शेकडो परिचितांना मिळवून दिली हजारोंची बक्षिसे

प्रगती जाधव-पाटील -- सातारा --वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या शब्दकोड्यांच्या माध्यमातून शेकडो नातेवाईक आणि परिचितांना भरघोस बक्षिसे मिळवून देणारे जगन्नाथ तुकाराम बाबर परिसरात ‘कोडेवाले आजोबा’ म्हणून परिचित आहेत. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील जगन्नाथ बाबर हे गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यात राहतात. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या रिकाम्या वेळेत त्यांनी शब्दकोडे सोडविण्यास सुरुवात केली. त्यानंतर सहज कुतूहल म्हणून त्यांनी एका शब्दकोड्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्यात त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस लागले. यातून हुरूप मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी त्याच स्पर्धेत भाग घेतला. सगळी उत्तरे बरोबर येऊनही त्यांच्या पदरी निराशा पडली. असे दोन-तीनवेळा झाल्यानंतर त्यांनी थेट संबंधितांना फोन करून याविषयी विचारले. ‘एका व्यक्तीला एकदाच बक्षीस देतो आम्ही,’ हे उत्तर त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईक आणि परिचितांच्या नावाने शब्दकोडे पाठविण्यास सुरुवात केली. एकसारखे अक्षर दिसू नये म्हणून त्यांनी आपल्या नातवंडांचीही कोडे लिहून घेण्यासाठी मदत घेतली. सर्व पै-पाहुण्यांना मिक्सरपासून तेलाच्या पिशवीपर्यंतची सर्व बक्षिसे मिळवून दिल्यानंतर बाबर यांनी शेजाऱ्यांच्या नावानेही शब्दकोडे पाठविण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे जांभळे विकायला येणाऱ्या दुर्गम भागातील महिलेलाही त्यांनी मिक्सर मिळवून दिला. ‘टपालाचा खर्च तुम्ही करता बक्षीस राहू दे तुम्हाला’ असे त्यांना सांगिंतले; पण ‘तुमच्या नशिबाचे तुम्हा पाशीच असू दे’ असे म्हणत त्यांनी कोणाच्याही बक्षिसावर स्वत:चे नाव ठेवले नाही. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या त्यांच्या या समाजसेवेचे अनेकांनी कौतुकही केले आहे. तल्लख बुद्धी, सुरेख अक्षर आणि मांडणीचे कसब असलेल्या बाबर यांच्याकडे शब्दांचा अक्षरश: खजिना आहे.असे सोडवतात शब्दकोडे...!जगन्नाथ बाबर एका दिवसाला चार वृत्तपत्रांमध्ये आलेले शब्दकोडे सोडवतात. कोणतेही शब्दकोडे सोडवताना त्यांना त्यात खाडाखोड झालेली आवडत नाही. म्हणून ते शब्दकोड्याची प्रतिकृती एका कागदावर रेखाटतात. ही प्रतिकृती रेखाटण्यासाठी ते नातवंडांनी वापरलेल्या वहीची कागदे किंवा एका बाजूला वापरून दुसरी बाजू कोरा असलेला कागद वापरतात. शब्दकोड्यातील कोणताही शब्द अडला तर बाबर त्यासाठी आपल्या नातेवाइकांसह काही शिक्षकांची मदत घेतात. पूर्ण शब्दकोडे सोडविल्यानंतर ते पक्क्या कागदावर उतरवून काढतात. बाबर यांची नातवंडे आळीपाळीने हे कोडे कागदावर बिनचूक उतरवितात.