शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद म्हणुनी पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

रामापूर : कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं असं आक्रीत घडलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगराची कडा कोसळली अन् अख्खी ...

रामापूर : कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं असं आक्रीत घडलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगराची कडा कोसळली अन् अख्खी वस्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ढिगाऱ्याखालून एक-एक मृतदेह बाहेर काढला जात होता अन् नातेवाइकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता. पाटण तालुक्यातील आंबेघर (खालचे) येथील ही हृदयद्रावक घटना मन सुन्न करणारी होती.

सातारा जिल्ह्याला यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. वाई, व पाटण तालुक्यांत दरडी कोसळल्याने अनेक घरे मातीखाली गाडली गेली. या घटनेत कोणी आपली आई गमावली, तर कोणी वडील, कोणी आपलं लेकरू गमावलं, तर कोणी आपलं अख्खं कुटुंबच. निसर्गाने शेकडो कुटुंबांचा निवारा हिसकावला शिवाय कधीही भरून न येणारे नुकसानही केले. पाटण तालुक्यात गुरुवारी (दि. २२) रात्री आंबेघर (खालचे) येथे झालेल्या भूस्खलनात पंधरा लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर व बचावपथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर शनिवारपासून बचावकार्याला गती आली. एनडीआरएफचे जवान व ग्रामस्थांनी संकटांशी चार हात करत सुुरुवातीला ११ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले, तर शनिवारी आणखी ३ मृतदेह आढळून आले. मृतदेह बाहेर काढताच नातेवाइकांच्या अश्रूंना बांध फुटत होता. हे विदारक चित्र पाहून उपस्थितांची मनेही हेलावून गेली. ‘निसर्गानं आमचा संंसार मोडून पाडला. कुटुंबं उद्‌ध्वस्त केली. आता आमच्याकडे अश्रूंशिवाय दुसरं काहीच उरलं नाही,’ अशा भावना कुटुंबीय व्यक्त करीत होते. आंबेघर दुर्घटनेत आजवर १४ ग्रामस्थांचे मृतदेह आढळून आले असले तरी अजूनही ९ महिन्यांच्या बाळाचा शोध काही लागलेला नाही. जागेवरच शवविच्छेदन करून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

(चौकट)

ग्रामस्थांचे सांत्वन...

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसीलदार योगेश टाम्पे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी आंबेघरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच ग्रामस्थांचे सांत्वनही केले. पाटण शहरासह ठिकठिकाणचे तरुण ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

फोटो : २५ रामापूर