शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात ‘प्रहार’ विधानसभा निवडणूक लढविणार, बच्चू कडू यांनी केली घोषणा

By नितीन काळेल | Updated: October 16, 2023 15:57 IST

शासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले

सातारा : दिव्यांग बांधवांशी आमची बांधिलकी आहे. त्यामुळे कोणतीही युती मी मानत नाही. त्यामुळे माण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रहार संघटना लढविणार आहे, अशी घोषणा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी केली. तसेच शासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.सातारा येथे दिव्यांग आपल्या दारी अभियानासाठी आल्यावर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.बच्चू कडू म्हणाले, दिव्यांग आपल्या दारी अभियानाचा साताऱ्यातील कॅम्प चांगला ठरला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाबाबत तक्रारी असल्यातरी जिल्हाधिकाऱ्यांचे काम चांगले आहे. दिव्यांगांच्या बाबतीत काही निर्णय बदलणे गरजेचे आहे. त्याशिवाय दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार नाही. या अभियानात सातारा जिल्हा राज्यात आदर्श ठरेल अशी अपेक्षा आहे. यासाठी मी दोन महिन्यातून एकदा येथे येणार आहे. आता दिव्यांगांच्या अडचणीचे काय धोरण आहे ते ठरवून त्यासाठी चांगल्या निर्णयाचे तोरण बांधणार आहे. यापुढे दिव्यांगाकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकीत याचे उत्तर संबंधितांना मिळणार आहे. कारण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दिव्यांगाची संख्या मोठी आहे.राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर पत्रकारांनी बोलते केल्यावर मला मंत्रीपद नको आहे, असे त्यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितले. तसेच प्रहार संघटना राज्यात १५ ठिकाणी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर कडू यांनी सातारा जिल्ह्यातही निवडणूक लढविणार आहे. यासाठी माण-खटाव मतदारसंघात प्रहारचा उमेदवार १२० टक्के असेल असे सांगितले. तर यावर त्यांना तुम्ही युतीत असताना माण मतदारसंघाबाबत असा निर्णय घेणार का ? असा प्रश्न केल्यावर त्यांनी मी युती मानत नाही, असे निक्षून सांगितले.त्याचबरोबर राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी कोणतेही सरकार शेतकऱ्यांना देण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे आरक्षणासारखे मुद्दे पुढे येत आहेत असे सांगतानाच लोकसंख्येत शेतकऱ्यांचा वाटा किती ? त्याप्रमाणात राज्य आणि केंद्र शासनाने शेतकऱ्यांना वाटा द्यावा. तसेच शेतकऱ्याला आऱ्थिक आरक्षण द्यायला हवे, असेही स्पष्ट केले.

दिव्यांग बांधवांच्या निवेदनाचा स्वीकार...कार्यक्रम संपल्यानंतर बच्चू कडू हे सभागृहात प्रत्येक दिव्यांगापुढे जाऊन त्यांचे निवेदन घेत होते. खुर्चीवर बसलेला दिव्यांग बांधव आणि त्यांच्या बरोबरबरीने आलेले नातेवाईक हे बच्चू कडु यांना माहिती द्यायचे. त्याप्रमाणे कडू निवेदन घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना करत होते. जवळपास अडीच तास कडू यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBacchu Kaduबच्चू कडूvidhan sabhaविधानसभा