शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी केलीतर प्रभाकर देशमुख घरातून बाहेर पडले नसते - जयकुमार गोरे 

By नितीन काळेल | Updated: August 31, 2023 19:32 IST

अपेक्षा असेल तर तसा विचार करू 

सातारा : मी कधीही गुंडगिरी केली नाही. कारण माझ्या गावात प्रभाकर देशमुख यांचं निवडणूक बूथ असतो. त्यांना मतेही पडतात. मी गुंडगिरी केली तर ते घरातून बाहेरही पडले नसते. त्यांची अपेक्षा असेल तर तसा विचार करू, असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला. सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी आमदार गोरे यांनी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज घोरपडे आदी उपस्थित होते. साताऱ्यात टंचाई आढावा बैठकीसाठी आल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कोयना धरण भरले नाही. ८७ टीएमसी पाणीसाठा आहे. तसेच उरमोडी धरण नेहमी भरते. यावर्षी ६० टक्के पाणी आहे. तसेच अनेक तालुक्यात चारा टंचाई जाणवत आहे. चारा छावणी सुरू करावी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. याबाबत शासनही गंभीर आहे. या दुष्काळला ताकदीने सामोरे जायला लागणार आहे. आता परतीचा मान्सून सुरू होईल. तो चांगला पडावा अशीच भावना आहे. यावेळी आमदार गोरे यांना पत्रकारांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबद्दल भाष्य केल्याचा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पाहिले होते. तसेच हे स्वप्न असावे, असा टोला लगावला. तर रोहित पवार यांनी मानमधील राष्ट्रवादीच्या सभेत पालकमंत्री दुष्काळ पाहणीसाठी आले नसल्याची टीका केली होती, पत्रकारांच्या या प्रश्नावर आमदार गोरे यांनी त्यांच्या तोंडी हे शोभत नाही. ज्या लोकांनी या भागात कायम दुष्काळ राहावा ही व्यवस्था केली. त्यांनी असे बोलावे हे हास्यास्पद आहे, असा प्रहार केला. मानमध्ये महिलेला मारहाण निषेध... माण तालुक्यात एका महिलेला मारहाण झाल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आमदार गोरे यांनी झालेली घटना निंदनीय आहे. याचा निषेध आहे, असे सांगून याबाबत मी पोलिसांशी बोललो आहे असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणJaykumar Goreजयकुमार गोरे