शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 12:35 IST

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलने २१ पैकी ...

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलने २१ पैकी १७ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचा या निवडणुकीत पराभव झाला.जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी अकरा जागा यापूर्वीच सहकार पॅनलने बिनविरोध करत वर्चस्व मिळवले होते. उर्वरित दहा जागांसाठी रविवारी मतदान झाले. जिल्ह्यातील ११ तालुक्यामधून ९६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जावळी, खटाव या दोन तालुक्यातून १०० टक्के मतदान झाले. बहुतांश तालुक्यांमधून ९० टक्‍क्‍यांच्यावर मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण १ हजार ९६४ मतदारांपैकी १ हजार ८९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सातारा येथील नागरी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये मतमोजणी पार पडली.दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सहा जागा सहकार पॅनलला मिळाल्या. तर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. कराड सोसायटी मतदार संघामध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा पराभव करत या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण सोसायटी मतदारसंघातून नशीब आजमावले; परंतु त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजीतसिंह पाटणकर यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.माजी मंत्री व राष्ट्रवादीचे हेविवेट नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा अपक्ष उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या खटाव आणि माण विकास सेवा सोसायटी निवडणुकीमध्ये सहकार पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. खटाव सोसायटी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते. मात्र या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक नंदकुमार मोरे यांचा घार्गे यांनी दारुण पराभव केला. माण सोसायटी मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे शेखर गोरे यांनी विजय मिळवला. कोरेगाव सोसायटी मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव महाडिक यांचा पराभव करून सुनील खत्री विजयी झाले आहेत.इतर इतर मागास प्रवर्ग मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व विद्यमान संचालक प्रदीप विधाते यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. नागरी बॅंका पतसंस्था मतदारसंघांमध्ये रामभाऊ लेंभे यांनीदेखील प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील जाधव यांचा पराभव केला. महिला राखीवच्या दोन जागांवर सहकार पॅनलने विजय मिळवला. या ठिकाणी कांचन साळुंखे आणि ऋतुजा पाटील यांनी विजय मिळवला आहे.मतमोजणीनंतर राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेकजावळी सोसायटी मतदार संघाची मतमोजणी झाल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी भावनावर दगडफेक केली. या दगडफेकीतबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. काही लोकांनी भावनेच्या भरात हे कृत्य केले आहे. माझा पराभव हा पक्षातीलच काही नेत्यांमुळे झाला. याबाबत दिनांक २५ नोव्हेंबर नंतर मत व्यक्त करेन, असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.शेखर गोरे, सुनील खत्री यांना चिठ्ठीने दिली साथमाण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी ३६ पडली होती. कोरेगाव सोसायटी मतदार संघामध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी ४५ मते पडली. दोन्ही ठिकाणी उमेदवारांना समसमान मते पडल्याने या मतदारसंघाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. इतर सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थिनीच्या असते आणि निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत दोन्ही मतदारसंघांमध्ये ईश्वर चिठ्ठी काढली. शिवसेनेचे शेखर गोरे आणि सुनील खत्री यांना या चिठ्ठीने साथ दिली आणि ते विजयी ठरले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकElectionनिवडणूकBalasaheb Patilबाळासाहेब पाटील