शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काकांकडील सत्ता नव्या पिढीकडे!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

आता दहिवडीला वेध : नगरपंचायत म्हणजे काय रे भाऊ?

नवनाथ जगदाळे --दहिवडी --लोणंद ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने आता दहिवडीलाही लवकरच नगरपंचायत दर्जा मिळणार आहे. दहिवडीला नगरंपचायत झाल्यानंतर अनेक सुविधा मिळणार, अशी चर्चा होत असल्याने ‘नगरपंचायत म्हणजे काय रे भाऊ?,’ असा प्रतिप्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. त्यातच नगरंपचायत होण्याने दोन्ही काकांकडील सत्ता कदाचित नवीन पिढीकडे जाऊ शकते. सातारा जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यापैकी लोणंद नगरपंचायत झाल्याने त्या पाठोपाठ आता दहिवडीलाही नगरपंचायत होणार, हे जवळपास निश्चित आहे. फक्त ती कधी होणार एवढाच प्रश्न राहणार आहे. दहिवडी नगरपंचायतीची सर्व प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाल्याने औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. त्यामुळे याची उत्सुकता लागून राहिली आहे. दहिवडी नगरपंचायत होताच अनेक राजकीय संदर्भ बदलणार आहेत. पूर्वीपासून वॉर्डरचना दहिवडीला अस्तित्त्वात होती. ६ वॉर्डमधून १७ उमेदवार निवडून जात होते. त्यापैकी भवानवाडी वॉर्ड वाड्या -वस्त्या तर तुपेवाडी व विठोबा वॉर्ड, काही प्रमाणात गांधी वॉर्डाची रचना शहर व वाड्या-वस्त्या असा होता. तर श्रीराम वॉर्ड व सिद्धनाथ वॉर्ड दहिवडी मुख्य शहरात होता. त्यामुळे ग्रामपंचायतीला प्रतिनिधी निवडून देताना लोकांच्या अंगवळणी पडले होते. आता नवीन अध्यादेशानुसार प्रभाग पद्धत झाल्यास काही ठिकाणी उमेदवार देताना, प्रतिनिधी निवडून देताना कसरत करावी लागणार आहे. भटकीमळा, भवानवाडी, डबरमळा, तुपेवाडी, शिंदेमळा, कटपाळेमळा या वाड्या-वस्त्यांना स्वत:च्या उमेदवाराला मतदान करता येत होते; परंतु प्रभाग रचनेमुळे प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार असल्याने लोकांना राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्या स्मिता वायदंडे व पंचायत समिती सदस्य व विद्यमान उपसभापती अतुल जाधव यांच्यानंतर दहिवडी हे गाव पूर्णत: वगळले जाणार असल्याने त्यांची ही शेवटची टर्म असणार आहे. नवीन प्रभाग रचनेमुळे ग्रामपंचायतीच्या सुरुवातीच्या काळापासून राहिलेली दोन्ही काकांकडील सत्ता हळूहळू नवीन पिढीकडे सरकणार आहे. प्रभाग रचनेमुळे प्रत्येकाच्या वैयक्तिक कामावर मतदान होणार असल्याने नेत्यांचे अस्तित्त्व कमी होऊन बंडोबाचे पेव फुटणार आहे. नगरपंचायत झाल्याने दहिवडी गावाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. दहिवडी शहराचा विकास होणार आहे.पायाभूत सुविधा मिळणार...दहिवडी शहराची लोकसंख्या १७ हजारांच्या वर आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्वच शासकीय मुख्यालये दहिवडीला असल्याने लोकांची येथे नेहमीच वर्दळ असते. अशावेळी त्यांना पायाभूत सुविधा देताना ग्रामपंचायतीवरही ताण येत असतो. नगरंपचायतीमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने उत्पन्न वाढणार आहे. निधी मिळाल्याने पायाभूत सुविधा पुरविण्यास मदत होणार आहे. तर नुकताच लोंणदला नगरंपचायतीचा दर्जा मिळाल्याने आता नंबर दहिवडीचाच अशी चर्चा होत आहे.