शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

माढ्याला खिंडार; विस्कटली ‘घडी’! अखेर वेळ साधली : नाराज रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:36 IST

नितीन काळेल । सातारा : राष्ट्रवादीत नाराज असलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी सुरू असणारी वंदता ...

ठळक मुद्देराष्ट्रवादीसाठी निवडणूक अग्निदिव्य

नितीन काळेल ।सातारा : राष्ट्रवादीत नाराज असलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी सुरू असणारी वंदता अखेर खरी ठरली असून, ते बुधवारी कमळ हाती घेणार आहेत. यामुळे माढ्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचा एक बुरूज ढासळत असून, दुसरीकडे मतदार संघातील ‘घडी’ ही विस्कटत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी आताची निवडणूक अग्निदिव्यासारखी ठरणार आहे. दरम्यान, रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये जाणार हे ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे.

माढा लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे दुसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हेही राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी करत होते. या घडामोडीत आपल्याला उमेदवारी कदाचित मिळणार नाही, याचा अंदाज मोहिते-पाटील यांना आला. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मोहिते-पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्याबाबत उदासिनता दिसून आली होती. त्यावेळी त्यांनी चाणाक्षपणे खेळी करून खुद्द शरद पवार यांनाच माढ्यातून लढविण्याचे सूचवले होते.

या प्रस्तावावर पवार यांनीही आढेवेढे घेतले; पण तेही काही दिवसांत राजी झाले. मात्र, त्यांनी माघार घेतली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घेतलेली भेट. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटाला जबरदस्त हादरा बसला. निवडणुकीत रणजितसिंह हे शत्रूच्या गोटात कसे गेले? माढ्यातून उमेदवारी दिली तर त्यांचा टिकाव लागणार का? का ते निवडणुकीनंतर शत्रूशी हातमिळवणी करणार, इथपर्यंत राष्ट्रवादीने विचार केल्याची माहिती आता पुढे येत आहे. त्यामुळे रणजितसिंह यांना इच्छा असूनही राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. तर शेवटी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तरी नको, असे सांगितले होते. अशी चर्चा आहे.

मोहिते-पाटील घराणे काहीतरी वेगळे पाऊल नक्कीच उचलणार, याचा अंदाज आला होता आणि याचाच भाजपने फायदा घ्यायचा ठरविले व यशस्वीही झाले.सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे मोहिते-पाटील घराणे हे राजकारणातील मोठे प्रस्थ. सोलापूर जिल्ह्यात या घराण्याचे राजकीय वर्चस्व होते. ते भाजपमध्ये जात आहेत. राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का आहे. कारण, साखर कारखाने, विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असणारे मोहिते-पाटील घराणे राजकारणातील ‘दादा’ समजले जाते. भाजपची ताकद या घराण्यामुळे वाढली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. तर माढ्यातून दोनवेळा विजय मिळविणारी राष्ट्रवादी आता काय पवित्रा घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.संजयमामा का प्रभाकर देशमुख...भाजपमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील हे प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माढ्यातील भाजपच्या उमेदवारीचा प्रश्न निकालात निघाल्याचेच समजले जाते; पण आता राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार ? या विषयावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत मिळत आहेत; पण संजयमामा हे लोकसभा निवडणूक लढविण्याचे टाळत आहेत. त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ शेवटी कोणाच्या गळ्यात पडते? हे पाहणे कुतूहलाचे ठरले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर