शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

डाकपालाने केला दीड लाखाचा अपहार

By admin | Updated: April 2, 2015 00:38 IST

‘आरडी’, ‘एसबी’तील पैसे हडपले : करवडीच्या टपाल कार्यालयातील प्रकार

कऱ्हाड : करवडीच्या टपाल कार्यालयातील डाकपाल यशवंत कृष्णत कुंभार (रा. करवडी) याने ग्राहकांच्या बचत खाते व एसबी खात्यावरील सुमारे दीड लाखाची रक्कम परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रविकुमार पांडुरंग झावरे यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार डाकपाल कुंभार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवडी येथील टपाल कार्यालयात यशवंत कुंभार हा डाकपाल म्हणून नोकरीस आहे. त्याने २०१२ ते ७ फेब्रुवारी २०१३ दरम्यान वेळोवेळी टपाल कार्यालयात आरडीसाठी लोकांनी भरलेल्या पैशांचा अपहार केला. तसेच एसबी खात्यावरील पैसे खातेदारांच्या बोगस सह्या करून काढले आहेत. एकूण १ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा अपहार झाला आहे. त्यामध्ये भारती सुनील धोकटे यांचे १६ हजार १००, सुशीला रघुनाथ लांडगे यांचे १ हजार, शारदा बबन कानकात्रे यांचे ९०० रुपये, विमल लक्ष्मण सुळे यांचे ११ हजार ८५०, सुमन विलास शिंंदे यांचे ३ हजार २००, आप्पासाहेब रामचंद्र पिसाळ यांचे ४ हजार ९५०, जयश्री गजानन चिंंचकर यांचे ६००, जिजाबाई शंकर बामणे यांचे ३४ हजार, आनंदा जगन्नाथ गायकवाड यांचे २० हजार १००, सुमन यशवंत पिसाळ यांचे २ हजार ३५०, लक्ष्मण सुळे यांचे २८ हजार, शोभा एस. ननावरे यांचे १ हजार ५००, शालन रघुनाथ जाधव यांचे ३ हजार २००, शुभांगी चंद्रकांत मदने ११ हजार ७५०, इंदुताई बाळासाहेब भोसले १३ हजार २५० यांच्यासह अन्य काहीजणांच्या रकमेचा यशवंत कुंभार याने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. बोगस सह्या करून खातेदारांच्या खात्यावरील पैसे काढण्याबरोबरच खातेदारांनी त्यांच्या खात्यावर भरलेले पैसे त्याने पोस्टात जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी हे पैसे वापरले, असे रविकुमार झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हाकऱ्हाड : बेकायदा दारू विक्रीप्रकरणी कार्वे येथील दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. सुनीता सुभाष पोटला व तात्यासाहेब यशवंत जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुनीता पोटला हिच्याकडून ५४० रुपये किंमतीच्या देशीदारूच्या बारा बाटल्या व तात्यासाहेब जगताप याच्याकडून ५४० रुपयाच्या देशीदारूच्या बारा बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या. महिलेचा मृतदेह आढळलाकऱ्हाड : येथील प्रीतिसंगम घाटावर कोयना नदीपात्रात सुमारे ५५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. संबंधित महिलेच्या अंगात गुलाबी रंगाची साडी व तपकिरी रंगाचा ब्लाऊज आहे. गत काही दिवसांत नागरिकांनी संबंधित महिलेला प्रीतिसंगम परिसरात फिरताना पाहिले होते, असे पोलिसांनी सांगितले. संबंधित महिलेची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. रक्कम वसूल करून सरकारजमालेखा परीक्षण पडताळणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर यशवंत कुंभार याची खातेनिहाय चौकशी करून त्याच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच ती रक्कम सरकारजमा करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.