शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

सातारा : स्वयंपाकाचा गॅस जवळपास ८०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात ...

सातारा : स्वयंपाकाचा गॅस जवळपास ८०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. ही कुटुंबे आता गॅस महागल्यानंतर पुन्हा चुलीकडे वळू लागली आहेत. न परवडणारा गॅस घेण्यापेक्षा शेतातील उसाचे बुडके अन्‌ ओढ्या, नदीला पडलेल्या काट्या आणून स्वयंपाक शिजविण्यास या महिलांनी सुरुवात केलेली आहे.

केंद्र शासनाने मोठी जाहिरातबाजी करून गोरगरीब महिलांना उज्ज्वला गॅस योजनेत घेतले. ज्या महिला चुलीपुढे बसून स्वयंपाक करत होत्या, त्यांच्या डोळ्यांतील पाणी शासनाला बघवले नव्हते. मात्र आता गॅसच्या दरवाढीमुळे महिलांच्या डोळ्यांत येणारे पाणी दिसत नाही का? अशी परिस्थिती आहे.

प्रत्येक घरात गॅस आला. त्यामुळे रेशनवर मिळणारे रॉकेलदेखील बंद केले. यापूर्वी महिला चूल, स्टोव्हचा वापर स्वयंपाकासाठी करत होत्या. मात्र, रॉकेलच मिळत नसल्याने स्टोव्ह कालबाह्य झाले, तर चुलीही ठिकठिकाणी बंद झाल्या. चुलीचा धूर दिसेनासा झाला. महिलांना मोफत गॅस कनेक्षन मोफत देण्यात आल्याने सुरुवातीला त्यांना दिलासा मिळाला होता. परंतु आताच्या घडीला घरातल्या गॅसचं ओझं गरिबांना परवडेना झालं आहे.

गॅसची सबसिडी देखील बंद केली गेल्याने गरीब कुटुंबांची वाताहत सुरु झालेली आहे. गॅसपेक्षा चूल बरी, असे म्हणत अनेकांनी पुन्हा चुली पेटवल्या आहेत. गोरगरीब लोक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असतात, त्यांना गॅस घेणे परवडत नाही, असे या योजनेतील लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

लोगो - रियालिटी चेक

१) पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी १ लाख २३ हजार ४४७

२) गॅस आवाक्याबाहेर

जानेवारी २०२० : ७०७ रुपये

जुलै - २०२० : ५९९ रुपये

जानेवारी - २०२१ : ६९९ रुपये

फेब्रुवारी - २०२१ : ७९९ रुपये

(घरगुती गॅस सिलिंडरचे दर)

प्रतिक्रिया (उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस घेतलेल्या पाच गृहिणींच्या प्रतिक्रिया)

दररोज मोलमजुरी करावी तेव्हा कुठे दोनवेळच्या खाण्याची तजवीज होतेय. पंतप्रधान योजनेतून गॅस मिळाला, तेव्हा काहीसे समाधान वाटले; परंतु दिवसेंदिवस गॅसच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ होत आहे.

- रुक्मिणी गायकवाड, अंगापूर

आधी आम्ही चुलीवर स्वयंपाक करत होतो. शेतातून काम करून येत असतानाच जळणाचं ओझं घेऊन येत होतो. या जळणात दोन दिवसांचा स्वयंपाक व्हायचा, अंघोळीचं पाणीही तापायचं. हे जळण शेतात, ओढ्याकडेला कुठेही उपलब्ध होत होतं.

- सावित्री पवार

गॅस सिलिंडरचा दर आवाक्याबाहेर गेलेला आहे. नाईलाजाने गॅस बंद ठेवून पुन्हा आपली चूलच पेटवलेली बरी, म्हणत जळाण काटूक गोळा करून खाण्याची तयारी करावी लागत आहे.

- लक्ष्मी जाधव

सरकारनं मोफत गॅस देऊन आमच्या डोळ्यांतील पाणी थांबवले असं वाटत होतं. आता मात्र गॅस दर आमच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. हे पाणी सरकारला दिसत नाही का? सरकारनं परवडणाऱ्या दरात घरगुती गॅस उपलब्ध करावा.

- सुनंदा कदम

गॅस दरवाढीने हातावर पोट असणाऱ्या आमच्यासारख्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांना फटका बसतोय. केंद्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन गॅसचे दर सर्वसामान्यांना परवडतील एवढे करावेत, अन्यथा रेशनवर रॉकेल पुरवठा पुन्हा सुरू करावा.

- समृध्दी साळुंखे

गरिबाच्या डोळ्यांतील पाणी दिसत नाही का?

बीपीएल कार्डधारक कुटुंबाचे महिन्याचे साधारण उत्पन्न २ हजारांच्या आतच असते. त्याचा एकूण खर्च आणि गॅसचा वाढलेला खर्च याचा ताळमेळ बसविणे आता कठीण जात आहे. २ हजारांतील ८०० रुपये जर गॅस खरेदीसाठी गेले, तर उरलेल्या पैशांत कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न आहे. गरिबांच्या डोळ्यांतील पाणी सरकारला दिसत नाही का? असा सवाल या महिला विचारत आहेत.

(दोन कॉलम)

फोटो ओळ : सातारा शहरातील ही महिला गॅसचा दर आवाक्याबाहेर गेला असल्याने चुलीवर स्वयंपाक करत आहे. (छाया : जावेद खान)

25जावेद15, 16