शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राजकारण्यांना आणू वाड्यावरून बांधावर !

By admin | Updated: September 2, 2014 23:47 IST

राजू शेट्टी गरजले : फलटणच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ मेळाव्यात निवडणुकीचे रणशिंग

फलटण : ‘जनतेने मनात आणले तर ती भल्याभल्यांना पराभूत करू शकते. अन्याय झुगारा आणि महाविकासाला साथ द्या,’ असे आवाहन करतानाच ‘आम्ही राजकारण्यांना वाड्यावरून बांधावर आणण्याचा चंग बांधला आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. फलटण येथे ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीत झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘सामान्य माणसेच क्रांती करू शकतात. आता फलटण तालुक्यात क्रांतीची वेळ आली आहे,’ असे सांगून खा. शेट्टी म्हणाले, ‘सामान्य माणूस पिसाळला, तर तुमची शंभरी भरलीच समजा. घराघरात भांडणे लावून राजकारण करणाऱ्या दोन्ही काँग्रेसना जनतेने संपवावे. या मंडळींना सत्तेचा माज आला आहे. आपल्या डोक्यावर कायम लाल दिवा राहणारच, असा त्यांचा समज आहे. त्यांचा माज उतरविण्याचा शब्द मी देतो.’ ‘आमचा उमेदवार ‘शोपीस’ नसेल,’ अशा शब्दांत आमदार दीपक चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला लगावतानाच सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना लुटणारे साखर कारखानदार व बँका बुडवणाऱ्यांची चौकशी लावू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. ते म्हणाले, ‘फलटणमध्ये काही झाले तरी रासपचाच उमेदवार असणार आहेत. इथून पुढे कोणीही गुंडगिरी, अन्याय केला तर येरवडा जेलमध्ये जाल.’ यावेळी नगरसेवक अनुप शहा, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज शिंदे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, स्वराज संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुकर माळवे, डॉ. उत्तमराव शेंडे, प्रकाश बोंगळे, दत्तूभाऊ धुमाळ, आमीर शेख आदी उपस्थित होते. जिल्हा युवक काँग्रेसचे दिगंबर आगवणे यांनी कार्यकर्त्यांसह स्वाभिमानीत प्रवेश केला. (प्रतिनिधी)