सातारा : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सभा, रॅली काढण्यासाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. मात्र, यासाठी कायदेशीर परवानगी लागते. उरलेले काही दिवस कार्यकर्त्यांचा कस लागतो. अशा प्रकारच्या परवानगी घेताना वेळेचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत असतो. हे ओळखून पोलिसांनी या सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे.येथील प्रांत कार्यालयात ही योजना बुधवार दि. १७ पासून सुरू होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सोयीचे झाले आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार काही दिवसांतच शिगेला पोहोचणार आहे. या घाईगडबडीमध्ये रॅली, सभा घेण्यासाठी पोलिसांची व इतर विभागाची परवानगी लागते. वेळेवर परवानगी मिळत नसल्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंगही घडत होते. या ‘एक खिडकी योजने’मुळे प्रचाराला कार्यकर्त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे. वीझ वितरण कंपनी, पालिका, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विभागाील अधिकारी, कर्मचारी योजनेत सहभागी झाले आहेत. सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)सातारा विधानसभा मतदारसंघासाठी ‘टोल फ्री’ क्रमांक सातारा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत मतदार प्रलोबनास बळी पडू नयेत मतदारावर कोणीही गैरवाजवी प्रभाव पाडत असेल तर अशा बाबतीत सातारा विधानसभा मतदार संघासाठी टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. यासाठी १८००-२३३-२३९६ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सातारा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जून माने यांनी केले आहे. अशा तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशीही माहिती मल्लिकार्जून माने यांनी दिली आहे. सर्व विभाग एकत्र काम करणार निवडणुकीमध्ये रॅली, सभेसाठी परवानगी आवश्यक असते. मात्र काहीवेळेला कागदपत्रांमध्ये त्रूटी असल्यास परवानगी मिळत नाही. परिणामी कार्यकर्त्यांचा वेळ जातो. तसेच वादाचेही प्रसंग घडतात. त्यामुळे एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यासाठी ज्या त्या विभागाचे अधिकारी आहेत. पोलिसांच्या वतीनेही एक अधिकारी व चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी दिली.
निवडणुकीसाठी पोलिसांची एक खिडकी योजना
By admin | Updated: September 16, 2014 23:46 IST