शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

श्वानपुत्रासाठी पोलिसांचा भल्यापहाटे हायवेवर पाठलाग

By admin | Updated: February 4, 2015 00:01 IST

‘बिनतारी’वरून चोरीचा संदेश : पुणे जिल्ह््यातील पाच सधन युवकांना तातडीने अटक

राहुल तांबोळी - भुर्इंज -घरी बागायत. घरासमोर विविध मॉडेल्सच्या चारचाकींबरोबरच वेगवेगळ्या जातींच्या कुत्र्यांचीही फौज. मात्र, इतके असूनही एका अडीच महिन्याच्या डॉबरमॅन जातीच्या कुत्र्यावर जीव जडला अन् पाची बोटं तुपात असलेले हात चोरीसाठी सरसावले. पाचवड, ता. वाई येथून मध्यरात्री साडेअकरा वाजता कुत्र्याचे पिल्लू चोरून पाच युवक पळाले खरे; पण त्या पिलावर जीव असणाऱ्या मालकाने चोरी झालेल्या पिलासाठी पोलीस ठाण्याचे दरवाजे ठोठावले अन् एका कुत्र्याच्या पिलासाठी सुरु झाला भल्या पहाटे पोलिसांचा थरारक पाठलाग. रात्री एक वाजता पोलिसांनी जोशीविहीर येथे कुत्र्यासह पाच युवकांना पकडले. याबाबत माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड येथे हॉटेल लक्ष्मीच्या पाठीमागे हॉटेलचे मालक अजित जाधव राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी १५ हजार रुपयांना खरेदी केलेले डॉबरमॅन जातीचे कुत्र्याचे पिलू घराबाहेर खिडकीला बांधून ठेवले होते. मध्यरात्री साडेबारा वाजता कुत्रे ओरडल्याचा आवाज आला. त्यामुळे अजित जाधव यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दाराला बाहेरून कडी लावली असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी खिडकी उघडून पाहिले असता काही जण कुत्र्याच्या पिलाला पळवून नेताना दिसले. जाधव यांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. रात्रगस्तीवर असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना बिनतारेवरून घटनेची खबर समजताच त्यांनी महामार्गावर तपासणीस सुरुवात केली. त्यावेळी दोन दुचाकीवरून पाच युवक कुत्र्याचे पिलू घेऊन जाताना त्यांना दिसले. त्यांनी त्या दुचाकींचा पाठलाग सुरू केला. जोशीविहीर येथे त्या दुचाकींना पोलीस गाडी आडवी मारुन युवकांना कुत्र्याच्या पिलासह ताब्यात घेतले. याप्रकरणी अजित सोपान साळुंखे, राहुल निवृत्ती साळुंखे, सागर रामचंद्र गायकवाड (सर्व. रा. सावरदरे, ता. भोर) आणि प्रशांत महादेव शिंदे, अजित किसन शिंदे (रा. जांब, ता. वाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हवालदार पी. व्ही. हजारे तपास करीत आहेत. ‘सनी’ला पाहताच डोळ्यात आनंदाश्रूकुत्र्याचे पिलू चोरीला गेल्याने जाधव यांच्या घरी हलकल्लोळ माजला होता. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या या पिलाचे ‘सनी’ नाव ठेवले होते. सनी हरवला म्हणून घरातील सारेच चिंतेत होते. पहाटे साडेतीन वाजता जाधव यांनी ‘सनी’ सापडल्याचे फोनवरून सांगितल्यानंतर साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. जेवायला आले अन् कुत्रे पळविलेसावरदरे येथील युवक जांब येथे मित्रांकडे जेवायला आले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी हा उद्योग केला. त्यांचे कुटुंबीय जेव्हा पोलीस ठाण्यात आले, तेव्हा ‘एका कुत्र्याच्या पिलासाठी हा उद्योग कशासाठी केला, सांगितले असते तर अशी दहा कुत्री आणून दिली असती, अशा प्रश्नांची सरबत्ती केली.सुरुवातीला पोलीस कुत्र्याच्या चोरीची दखल घेतील की नाही, अशी शंका वाटत होती. पोलिसांनी स्वत: पाठलाग करून आमचा ‘सनी’ आम्हाला परत मिळवून दिला.- अजित जाधव