शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ‘हिटलिस्टवरील’ गुन्हेगार सातारारोड येथे जेरबंद

By admin | Updated: March 8, 2015 00:15 IST

कोरेगाव : धाकट्या भावाने पोलिसांना दिलेल्या टीपमुळे अट्टल चोरटा थोरला भाऊ पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला.

 चाकण, (जि. पुणे) येथील पोलीस रेकॉर्डवर असलेला संशयित संतोष कांतिलाल गुजर (वय २६) याला सातारारोड येथून पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी सकाळी शिताफीने अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अट्टल गुन्हेगार संतोष गुजरला शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी चाकणमधून त्याचा धाकटा भाऊ विशाल गुजर (वय २३, रा. नाणेकरवाडी) याला सातारारोडला आणले.थोरला भाऊ संतोष हा गेल्या काही महिन्यांपासून सातारारोड येथे पत्नीसमवेत राहत होता. याची माहिती धाकटा भाऊ विशालला होती. त्यामुळे पोलिसांनी संतोषला पकडण्यासाठी त्याच्या भावाचाच कौशल्याने वापर केला. पुणे पोलिसांची टीम सातारारोडला पोहोचल्यानंतर पोलिसांनी संतोषला अटक केली. थोरला भाऊ सापडल्याचे दिसताच विशालने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन धोम डाव्या कालव्यात उडी घेतली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. पुणे येथील चाकण भागामध्ये दरोडे, खून आणि मारामाऱ्या या सारखे गंभीर गुन्हे घडले होते. त्यामध्ये संघटित टोळ्यांचा सहभाग आहे. संतोष व विशाल गुजर यांच्या टोळीने पोलिसांना अक्षरश: जेरीस आणले होते. पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गाने तपास यंत्रणा राबवून टोळीच्या म्होरक्या विशाल यास जेरबंद केले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने टोळीतील महत्त्वाचा साथीदार आणि त्याचा थोरला सख्खा भाऊ संतोष यामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती. तो आपल्या पत्नीसह सातारारोड येथील मोतीचंदनगरमध्ये खोली भाड्याने घेऊन वास्तव्य करत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे संतोष गुजर पर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले. (प्रतिनिधी) आणखी गुन्हे उघडकीस येणार.. संतोष गुजर याची यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याच्यावर चाकणसह इतर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे आणि मारामाऱ्यांचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्याने आता संपूर्ण टोळीचा पर्दाफाश होईल, असा विश्वास पुणे ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला. विशाल आणि संतोष गुजर यांना चाकण येथे अधिक तपासासाठी नेले आहे.