सातारा : दरोडय़ाच्या गुन्हय़ाखाली अटकेत असलेल्या आरोपीने सातारा पोलिस कोठडीतील बाथरूमचे गज वाकवून पलायन केले. ही घटना रविवारी सकाळी घडली. लघुशंकेचा बहाणा करून पळालेल्या आरोपीचे नाव चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे ( तालुका फलटण ) असून लोणंद येथे नुकत्याच पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीत याचे नाव होते. धारदार कोयते अन् मिरचीची पूड याचा वापर करत ही टोळी दरोडे घालत होती. सातारा पोलिस ठाण्यातील कोठडीच्या पाठीमागे आरोपींसाठी शौचालय आहे. लघुशंकेचा बहाणा करून चंद्रकांत आतमध्ये गेला. त्यानंतर पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज वाकवून त्यातून तो बाहेर पडला. बराच वेळ झाला तो परत बाहेर आला नाही म्हटल्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर चंद्रकांतचा फोटो पोलिसांनी तातडीने सोशल मीडियावर फिरवण्यास सुरुवात केली आहे.
पोलीस कोठडीचे गज वाकवून आरोपीचे पलायन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 11:19 IST
दरोडय़ाच्या गुन्हय़ाखाली अटकेत असलेल्या आरोपीने सातारा पोलिस कोठडीतील बाथरूमचे गज वाकवून पलायन केले. ही घटना रविवारी सकाळी घडली.
पोलीस कोठडीचे गज वाकवून आरोपीचे पलायन !
ठळक मुद्देसातारा पोलिसांची धावपळ सुरू