शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज

By admin | Updated: January 2, 2017 23:11 IST

युवक खून प्रकरण : कऱ्हाडात तपास गतीने; अप्पर पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

कऱ्हाड : येथील गजानन हौसिंग सोसायटीत रविवारी झालेल्या खून प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. पोलिस पथकाने सोमवारी घटनास्थळी भेट देऊन नातेवाइकांकडून माहिती घेतली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक परजिल्ह्यात गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कऱ्हाडनजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीत रविवारी विजय रामचंद्र पवार या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. विजय पवार हा वीज कंपनीत सहायक लेखा व्यवस्थापक पदावर सांगली-विश्रामबागमध्ये कार्यरत होता. रविवारी सुटी असल्याने तो घरीच थांबला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र घरी आला. त्यावेळी विजयने त्याची कार मित्राकडे धुण्यासाठी दिली. मित्र संबंधित कार घेऊन कऱ्हाडातील सर्व्हिसिंग सेेंटरवर गेला. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास भाची चैताली हिने विजयला जेवण दिले. त्यानंतर ती क्लासला निघून गेली. एक वाजण्याच्या सुमारास मित्राने विजयला फोन केला. सर्व्हिसिंग सेंटरवर गर्दी असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी ‘कार न धुता ती घेऊन घरी ये,’ असे विजय त्याला म्हणाला. सुमारे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास तो मित्र कार घेऊन घरी गेला. तो घरामध्ये गेला असता विजय रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. हल्लेखोरांनी विजयच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचे समोर आले. तसेच खून करून कोयता, मंकी कॅप व जर्किन हल्लेखोराने घराच्या पत्र्यावर टाकले होते. पोलिसांनी ते ताब्यात घेऊन जप्त केले.या खून प्रकरणाचा रविवारपासून गतीने तपास सुरू आहे. रविवारी पोलिसांनी नातेवाइकांकडून माहिती घेतली. मात्र, त्यातून कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचता आले नाही. तसेच हल्लेखोराविषयीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. सोमवारी पोलिसांनी गणेश मंदिर तसेच परिसरातील काही खासगी ठिकाणी लावलेले सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. नातेवाईक व मित्रांकडूनही माहिती घेण्यात आली. (प्रतिनिधी)