शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

खांब रस्त्यावर अन् गटारे वाऱ्यावर !

By admin | Published: March 28, 2016 8:26 PM

वाहनांच्या संख्येत वाढ : लोणंदला वाहतुकीच्या समस्येचा विळखा; शिरवळ-बारामती चौपदरीकरण रस्ता महत्त्वाचा --लोणंदचं रणकंदन

राहिद सय्यद -- लोणंद -लोणंद शहरातून जाणारा शिरवळ-बारामती चौपदरीकरण रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच लोणंद-सातारा, लोणंद-खंडाळा, लोणंद-फलटण या बाजूकडून सर्वच रस्त्यांवर सर्व प्रकारची व अवजड वाहनांची वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच लोणंद मधील विद्युत, टेलिफोन खांब अडथळा ठरत आहेत. दुकानासमोरील पार्किंग, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटार व्यवस्था नसल्याने लोणंद शहर वाहतुकीच्या समस्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे.कांद्याची मोठी बाजारपेठ असलेले लोणंद शहर हे अनेक गावांतून येणाऱ्या लोकांसाठी रोजगार मिळवून देणारे ठरले आहे. त्यामुळे लोकांची व वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक लोकांना ये-जा करताना गर्दीचा संघर्ष करावा लागत आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रिंगरोड होणे गरजेचे आहे. शिरवळ-बारामती हे चौपदकरीकरण प्रभाग ४, ५, ६ मधून जाणारे आहे. लोणंद नगरपंचायतीचे पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना १७ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी १७ जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. परंतु लोणंदमधील नागरिकांना वर्षानुवर्षे ज्या समस्या उद्भवत आहेत त्याकडे कोणत्याही पक्षाचे किंवा सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही. क्त प्रत्येक निवडणुकीवेळी सर्वच नेत्याकडून आश्वासने सोडून काहीही मिळत नाही अशी स्थिती आहे. येथील प्रभाग क्र. ४, ५, ६ हे अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासलेले दिसून येत आहेत. यावर उपाययोजना होणे महत्वाचे आहे. प्रभाग क्र. ४ हा इंदिरा नगर, बाळासाहेब नगर, सरहदेचा ओढा परिसर असून, अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहे. प्रभागाची लोकसंख्या ९१७ असून, मतदार ९०३ आहेत. या प्रभागांमध्ये अनियमितपणे पाणी, रस्ता, अंतर्गत गटारे, सांडपाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतालय, कचराकुंड्या अशा अनेक गोष्टींच्या समस्यांनी हा प्रभाग ग्रासलेला आहे.प्रभाग क्र. ५ व ६ शिरवळ चौक ते अहिल्यादेवी स्मारक आहे. प्रभाग क्र. ५ ची लोकसंख्या ११२५ असून, मतदार १००० आहेत. इथे सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी आरक्षण आहे. प्रभाग ६ मध्ये लोकसंख्या १०९६ आहे. मतदार संख्या सर्वात कमी म्हणजे ३९९ इतकी आहे. येथील निवडणुकीतील आरक्षण सर्वसाधारण उमेदवारासाठी आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये अपक्षांची भाऊगर्दी दिसून येत आहे. येथील महत्त्वाच्या समस्या म्हणजे वीज, पाणी, अंतर्गत गटारे, रस्ते नाहीत. लोकांना निवांतक्षणी विश्रांती घेता यावी, तसेच लहान मुला-मुलींसाठी गार्डन, पार्क असण्याची गरज आहे. दोन्ही प्रभागांमध्ये वाहतुकीच्या त्रासामुळे पालकांना मुलांना शाळेत सोडावे लागत आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यासाठी पर्यायी रस्ता गावाबाहेरून होण्याची गरज आहे. प्रभाग ४ मध्ये रस्ता, गटारे, कचराकुंडी नसल्याने नागरिक सर्व कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत आहे.- दादा रणदिवे, नागरिक (प्रभाग क्र. ४)प्रभाग ५ मध्ये वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण जास्त असल्याने बाह्य वळण रस्ता होणे गरजेचे आहे. तसेच मोकाट जनावरे, ओला व सुका कचरा यांचे नियोजन करण्याची गरज आहे.- नितीन करंजे, नागरिक (प्रभाग क्र. ५)लोणंद-सातारा रस्त्यावर दोन्ही बाजूस सांडपाणी, गटारे यांची व्यवस्था नसल्याने सांडपाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच रस्त्यालगत असलेले विद्युत खांब, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. - विश्वास कापसे, नागरिक (प्रभाग क्र. ६)