शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डीजे वाजवा.. बघतो कोण काय म्हणतोय?; उदयनराजे भोसले यांचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:20 IST

उदयनराजेंनी थेट डीजेच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केल्याने यंदाच्या गणेशोत्सवात सातारकरांच्या कानठळ्या बसणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनोख्या शैलीची झलक सातारकरांना पुन्हा एकदा अनुभवता आली. त्यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या हटके अंदाजात कॉलर उडवत दहीहंडी सोहळ्यात तरुणाईची मने जिंकली; पण याही पुढे जात, ‘डीजे वाजवा, बघतो कोण काय म्हणतोय’ अशी गर्जना करून ‘डीजे’ला समर्थनही दिले. रविवारी रात्री हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.साताऱ्याच्या तालीम संघ मैदानावर दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. १७) रात्री झालेल्या या दहीहंडी सोहळ्यात सांगलीच्या शिवनेरी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. कार्यक्रमाची रंगत शिगेला पोहोचली असताना उदयनराजे भोसले यांनी स्टेजवर दमदार एंट्री केली. तरुणांचा उत्साह पाहून त्यांनी माइक हातात घेतला आणि थेट डीजेला पाठिंबा देणारी भूमिका जाहीर केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत टाळ्यांचा कडकडाट केला. उदयनराजे यांनी आपल्या अनोख्या शैलीत कॉलर उडविली. यानंतर ‘डीजे वाजवा.. मी बघतो कोण काय म्हणतोय’, असे म्हणताच तरुणाईने एकच जल्लोष केला. उदयनराजे यांचा हा व्हिडीओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, तो चर्चेचा विषयही ठरला आहे.

भूमिका स्पष्ट.. आता पुढे काय?गेले काही दिवस सातारा शहरात डीजे वाजवण्यावरून मतमतांतरे सुरू आहेत. एकीकडे गणेश मंडळे डीजेसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक शांततेच्या बाजूने आहेत. गणेश आगमन मिरवणुकीत नियमांची मर्यादा ओलांडली गेल्याने पोलिसांना कारवाईदेखील करावी लागली होती. आता उदयनराजेंनी थेट डीजेच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केल्याने यंदाच्या गणेशोत्सवात सातारकरांच्या कानठळ्या बसणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.