शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीची मोहीम गारठली; कचऱ्यात जिथे-तिथे प्लास्टिक दिसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 11:53 IST

कऱ्हाड : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचे तसेच कचऱ्यात साचणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण ...

कऱ्हाड : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचे तसेच कचऱ्यात साचणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. नाले, ओढे तसेच सार्वजनिक ठिकाणी इतर कचऱ्याबरोबर प्लास्टिक पिशव्यांचा खच पडत आहे.

शहरातून दररोज वीस टनांपेक्षा जास्त घरगुती कचरा संकलित केला जातो. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री व वापर केला जात आहे. संबंधित दुकानदार तसेच विक्रेत्यांवर नियमित कारवाई होत नसल्याने प्लास्टिक वापर व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात शंभरहून अधिक हॉटेल्स, चायनीज, वडापाव विक्रेते तसेच कापड दुकानदार, भांडीविक्री करणारे व्यापारी व व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.

भाजीमंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदिर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, बाराडबरी, बसस्थानक परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, दूरध्वनी केंद्र परिसर याठिकाणी प्लास्टिक कचरा साचत असल्याचे दिसून येत आहे.

जाळले तर प्रदूषण; साठवले तर कचरा

प्लास्टिक हा असा पदार्थ आहे की, तो पुरला तरी तो नष्ट होऊ शकत नाही. जाळला तर हवेचे प्रदूषण होते. त्यातून गंभीर आजारही होण्याची भीती असते. तसेच तो साठवून ठेवला तर त्यापासून दुर्गंधी व इतर आजारही होऊ शकतात.

कचऱ्यात दररोज २५ किलो प्लास्टिक

कऱ्हाड शहरातून दररोज सुमारे २४ टन कचरा संकलित केला जातो. या संकलित कचऱ्यात १० ते १२ टन सुका कचरा असतो. या सुक्या कचऱ्यात दररोज सरासरी २५ ते ३० किलो प्लास्टिक असते, असे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालिकेची स्वच्छता टीम

१८ : घंटागाड्या

९ : संकलन वाहने

१४० : सफाई कर्मचारी

१३ : मुकादम

१ : आरोग्य निरीक्षक

दररोज जमा होणारा कचरा

११ टन : सुका कचरा

१३ टन : ओला कचरा

विघटनासाठी लागतात शेकडो वर्षे!

- प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.

- प्लास्टिक पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे या पिशव्यांचे विघटन होत नाही.

- पिशवीचे पूर्णपणे विघटन होण्यासाठी चारशे ते पाचशे वर्षांचा कालावधी लागतो.

- आज आपण पिशवी वापरून टाकून दिली तर पुढच्या चार ते पाच पिढ्यांंना त्याचा त्रास होऊ शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlastic banप्लॅस्टिक बंदी