शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

झाडे-झुडपे जिवंतपणी सोसतायत मरण यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:15 IST

पेट्री : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गसौंदर्याला विघ्नसंतुष्टांची नजर ...

पेट्री : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गसौंदर्याला विघ्नसंतुष्टांची नजर लागली आहे. सातारा-कास मार्गावरील देवकल फाटा ते पारंबे फाटा या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वणवा लागल्याने शेकडो हिरवीगार झाडे आगीत होरपळली. तसेच शेकडो टन चारा नष्ट होऊन कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.कास, बामणोली येथे येणाºया प्रत्येक पर्यटकाला मायेच्या सावलीचा सुखावह स्पर्श देण्यात मोलाचा वाटा येथील घनदाट झाडी झुडपे, वृक्षांचाच आहे. येथील बहुसंख्य वनसंपदेनेच निसर्गाचे सौंदर्य वाढविलेले आहे. परंतु वणवा पेटविण्याºयांकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्गसौंदर्यही लोप पावू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.वणवा लावणाºयांकडून येथील परिसर भकास करण्याचाच जणू काही ठेका घेतल्याचे दिसत आहे. हा वणवा आता वृक्षांच्याच मुळांवर उठू लागला आहे. रोपट्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पावसापासून ही झाडे कित्येक वर्षे तग धरून पर्यावरणाचे संतुलन राखत असताना आता ही झाडे वणव्यात क्षणार्धातच जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.सातारा-कास मार्गावर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ठिकठिकाणी वणवा लावण्याचे प्रकार वाढले आहेत. रविवारी दुपारी देवकल फाट्यानजीक पेटविलेल्या वणव्याने रस्त्यालगत तसेच आसपास काही झाडांच्या बुंध्यांनीच पेट घेतला आहे. झाडांचे बुंधे आगीत धुपत असल्याने बुध्यांतून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. झाडाच्या बुध्यांची राख होते. तर त्यांच्या फांद्या व शेंड्याकडील भाग हिरवागार दिसत आहे. परंतु झाडांचा बुंधाच पेटला जाऊ लागल्याने ते निकामी होऊन काही झाडे उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा विकृत घटनांवर तत्काळ कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.वणव्यांची मालिका अखंडित..उन्हाची तीव्रता सर्वत्र भासत असून, या परिसरातील लाखो वृक्षांमुळे वातावरणात गारवा आहे. तसेच सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. परंतु परिसरात वणव्यांची मालिका अंखडित सुरू आहे. येथील परिसरात निर्माण होणारा भकासपणा पाहता सर्वत्र विचित्र खूप दिसत आहे. सकाळी पाहावं तर सर्वकाही ठिक; परंतु सायंकाळपर्यंत नाहीसा होताना दिसत आहेत.