शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीच्या पातळीवर ठरतेय स्मशानभूमीची जागा

By admin | Updated: August 8, 2014 00:41 IST

बनघर : आतापर्यंत आठवेळा उचलबांगडी; पावसाळ्यात शोधावी लागते जागा

विशाल गुजर - परळी ,, परळी खोऱ्यातील जवळपास नव्वद टक्के गावांत स्मशानभूमी आहे. मात्र, बनघर गाव याबाबतीत अधांतरीच आहे. उरमोडी धरणाच्या बाजूला हे गाव वसलेलं असल्यामुळे धरणातील पाणीच ठरवते गावच्या स्मशानभूमीची जागा. धरणातील पाणी जसे कमी होत जाईल तशी स्मशानभूमी सरकते. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते.बनघर हे गाव उरमोडी धरणात विस्थापित झाले आहे. २००० मध्ये त्याचे पुनर्वसन खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे झाले आहे. काही जणांना जमिनी मिळाल्या, काहींना मिळालीच नाही. तेथे पाण्याची गैरसोय, मुरमाड जमीन, मग खायचे काय, या विवंचनेमुळे या गावाने आपली मूळ जमीन सोडली नाही. या गावात १९५ कुटुंबे आहेत. ही कुटुंबे सहा ठिकाणी वसलेली आहेत. डोंगराच्या पायथ्याला गाव वसल्यामुळे आतापर्यंत आठ ठिकाणी स्मशानभूमी झाली आहे. धरणाची पाणीपातळी वाढली की अंत्यसंस्काराची जागा बदलावी लागते. उघड्यावर धरणाच्या काठी अंत्यसंस्कार केले जातात. पावसाळ्यात झाडाझुडपातून, काट्या-कुट्यातून, खाचखळग्यांतून वाट काढत स्मशानभूमीकडे जावे लागते. दीड-दोन किलोमीटरचा हा रस्ता तुडविणे म्हणजे जुलूम झाला आहे, अशा भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी गावासाठी कायमस्वरूपी स्मशानभूमी बांधून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.गाव उरमोडी धरणात गेले आणि सर्वजण वेगवेगळ्या पाच ठिकाणी राहिले. त्यामुळे आतापर्यंत आठ ठिकाणी स्मशानभूमी बदलली आहे. पावसाळ्यात जागा शोधून अंत्यविधी करावा लागतो. - रमेश गुजर, ग्रामस्थ, बनघर