शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

असाही प्रामाणिकपणा, पिंगळीच्या धनाजी जगदाळे यांनी सापडलेले ४० हजार रुपये केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 17:56 IST

पैशासाठी अनेक माणसं वाटेल ते करतात. अगदी नातीगोतीही तोडतात. अशामध्ये आपण प्रमाणिकपणा विरून गेलोय. मात्र प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचं दिसून आलं ते एका धनाजी जगदाळे नावाच्या व्यक्तीमुळे. होय माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील धनाजी जगदाळे यांनी सापडलेले ४० हजार रुपये परत केले व बक्षीसही स्वीकारले नाही. फक्त तिकिटासाठी ७ रुपये घेतले. यामुळे आजच्या काळात धनाजी हे मानाने धनवान ठरू शकतात.

ठळक मुद्दे पिंगळी बुद्रुकचे धनाजी मानाने धनवानसापडलेले ४० हजार रुपये केले परत

दहिवडी : पैशासाठी अनेक माणसं वाटेल ते करतात. अगदी नातीगोतीही तोडतात. अशामध्ये आपण प्रामाणिकपणा विरून गेलोय. मात्र प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचं दिसून आलं ते एका धनाजी जगदाळे नावाच्या व्यक्तीमुळे. होय माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील धनाजी जगदाळे यांनी सापडलेले ४० हजार रुपये परत केले व बक्षीसही स्वीकारले नाही. फक्त तिकिटासाठी ७ रुपये घेतले. यामुळे आजच्या काळात धनाजी हे मानाने धनवान ठरू शकतात.याबाबत माहिती अशी की, पिंगळी बुद्रुक येथील धनाजी जगदाळे (वय ५४) हे घरी जायला प्रवासासाठी पैसे नसल्याने कोणतरी ओळखीचे मिळेल, या आशेने दहिवडीच्या बसस्थानकात वाट पाहत बसले होते. बराचवेळ वाट पाहूनही कोणी येईना. रात्रीपर्यंत थांबले. त्यावेळी तेथे त्यांना एका व्यक्तीचे ४० हजार रुपये सापडले. मात्र, ते पैसे घेऊन निघून जावे, असा किंचितही विचार त्यांच्या मनात आला नाही.

त्याचवेळी धनाजी हे पैसे कोणाचे आहेत का? असे विचारू लागले. त्यानंतर धनाजींनी ज्याचे पैसे आहेत त्याला दिले. त्यावेळी धनाजी यांना बक्षीसरुपी एक हजार रुपये देऊ करण्यात आले; पण धनाजी म्हणाले, मला पिंगळीला जायचंय. माझ्याकडे पैसे नाहीत. मला फक्त प्रवासासाठी ७ रुपये द्या. त्यानंतर ४० हजारांतील ७ रुपयेच घेऊन धनाजी निघून गेले.

मनाने धनवान असलेल्या या धनाजींचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर धनाजींनी ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल आहे, असे सांगत संबंधिताचे डोळे पाणावले. बायकोचे आॅपरेशन कसे करायचे? हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता. कारण, त्यासाठीच संबंधित व्यक्तीने पैसे आणले होते.७ रुपयांसाठी अनेक गाड्या सोडल्या...धनाजी यशवंत जगदाळे यांचे हातावर पोट. दररोज काम केले तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यादिवशीही दहिवडीचा आठवडा बाजार झाल्यावर ते दहिवडी बसस्थानकात आले होते. त्यावेळी समोर गावाकडे जाण्यासाठी एसटी लागली होती; परंतु तिकिटासाठी ७ रुपये नव्हते. गावातीलही कोणी ओळखीचा दिसत नव्हता. अनेक एसट्या सोडल्या पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायचं कसं? हा विचार करत कंटाळलेले धनाजी बसल्या जागेवर झोपून गेले.

रात्री दहा वाजता जाग आली तेव्हा अंधार खूप पडल्याचे लक्षात आले. त्याचदरम्यान धनाजी जगदाळेंना जवळ ४० हजार रुपयांचा बंडल पडलेला दिसला. हे पैसे घेऊन दिवाळीचा सण चांगला साजरा करू, असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगदाळे हे धनवानच ठरलेत.

अनेक माणसे पैशाने श्रीमंत असतात; पण मनाची श्रीमंती असणारे धनाजी जगदाळे हे विरळच. ते शेजारी बसून ही वस्तुस्थिती सांगत होते. त्यावेळी माझ्याही डोळ्यात अश्रू आले. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे ही देवदूत पृथ्वीवर पाठवतो, याची प्रचिती आली. खरच धनाजी हे मनाने धनवान निघाले.- राजेंद्र जगदाळे, पिंगळी बुद्रुक 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर