शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लाल दिव्याभोवती पिंगा? आता वाजवा शिट्टी!

By admin | Updated: September 24, 2015 00:03 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : ‘श्रीराम’च्या वार्षिक सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीकास्त्र

फलटण : साखरधंद्यातले आपल्याला जास्त कळतेय, हे दाखवण्याच्या नादात अव्वाच्या सव्वा दर मागणारे आज सत्तेत आल्यावर गप्प बसून लाल दिव्याभोवती पिंगा घालत आहेत. दरासाठी आता तुमची शिट्टी का वाजत नाही? ऊस परिषद का होत नाही? आंदोलन होत नाही, असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नाव न घेता केला.येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘श्रीराम साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा आम्ही शब्द दिला होता, तो पूर्ण करीत आणला आहे. मोठ्या अडचणीतून कारखाना बाहेर काढताना एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. कारखान्याची देणी कमी करीत आणली असून सगळेच गोडधोड होत असताना कारखान्याला कधीही ऊस न घालणारे विरोधक सभेत नाहक प्रश्न उपस्थित करुन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सातत्याने कारखान्याच्या विरोधकात कोर्टकचेऱ्या करणाऱ्यांना खरेतर बोलण्याचा अधिकार नाही. विकृत बुध्दीने बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी कारखान्यात राजकारण आम्ही शिरू देणार नाही.’ शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना साखरधंदा व कारखाने तेजीत होते. ऊस उत्पादकांना चांगला दर मिळत होता. आता सत्ताबदल झाल्याने व नवीन सरकारचा साखरधंदा व सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने साखरधंदा अडचणीत येऊ लागला आहे. यापूर्वी आमचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत असताना ऊसदरासाठी जयसिंगपूरला ऊस परिषदा घेऊन दर ठरविणारे व आंदोलने करणारे आता कोठे आहेत, असा सवाल करुन आपल्याला शेती व साखर धंद्यातले जास्त कळतेय, असे समजणारे आता का आंदोलन करीत नाहीत, असा सवाल रामराजेंनी केला.संजीवराजे नाईक-निंबाळकर दादाराजे खर्डेकर, डॉ. बाळासाहेब शेंडे यांची भाषणे झाली. सभेपूर्वी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ रामराजेंच्या हस्ते पार पडला. (प्रतिनिधी)श्रीराम’कडून ८४ कोटी शेतकऱ्यांना अदाश्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाकडे गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ३ लाख ३३ हजार ५०१ मेट्रिक टन उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७.८२ रुपये दराने ८४ कोटी ६७ लाख ३ हजार १२० रुपयांचे पेमेंट आजअखेर संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. साखरेच्या दरातील घसरणीमुळे श्रीराम जवाहरकडे गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. तथापि, रामराजे नाईक-निंबाळकर, कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाशराव आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे श्रीराम साखर उद्योगास जिल्हा बँकेतून उसाचे पेमेंट अदा करण्यासाठी ११ कोटी १ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याने उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७ रुपये ८२ पैसे प्रमाणे पेमेंट करण्याचे शक्य झाल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. बलकवडीचे पाणी लवकरच आंदरुडलानीरा-देवघरच्या कालव्याचा प्रश्न एका गावामुळे अडला आहे. तो सुटल्यास कालव्यांची कामे मार्गी लागणार आहे. धोम-बलकवडीचे पाणी एक ते दीड वर्षात आंदरुडपर्यंत पोहोचणार आहे. मी पाहिलेले स्वप्न ९० टक्के पूर्ण झाले आहे. राहिलेले १० टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधकांकडे मोठे मन नाही. त्यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नये. श्रीराम कारखाना सुरळीत चालू राहण्यासाठी संपूर्ण ऊस कारखान्याला देण्याचे आवाहन रामराजेंनी केले.विरोधकांचा सभात्याग अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी या सभेत दोन प्रश्न उपस्थित केले. त्यांची अपेक्षित उत्तरे त्यांना न मिळाल्याने त्यांनी सर्व विरोधकांना घेऊन सभात्याग केला. त्यावेळी काही सत्ताधारी व विरोधकांत प्रश्नांवरून ‘तू तू - मैं मैं’ झाली.