शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काळूबाईच्या यात्रेसाठी मांढरगडावर भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:53 IST

वाई : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाईच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. जागर कार्यक्रमासाठी भाविक दाखल होऊ ...

वाई : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाईच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. जागर कार्यक्रमासाठी भाविक दाखल होऊ लागले आहेत. यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी असून, भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या पूर्वसंध्येला रविवार, दि. २० रोजी देवीची पालखीतून मिरवणूक काढून मंदिर परिसरात देवीचा जागर करण्यात येणार आहे. सोमवार, दि. २१ रोजी शाकंभरी-पौष पौर्णिमा असून पहाटे सहा वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्रमुख प्रशासक आर. डी. सावंत व पत्नी शमा यांच्या हस्ते व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश वर्षाताई पारगावकर तसेच विश्वस्त तथा प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, प्रशासकीय विश्वस्त तथा तहसीलदार रमेश शेंडगे, विश्वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक, अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, राजगुरू कोचळे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर व इतर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत काळेश्वरी देवीची महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर देवीचे दर्शन भाविकांना घेता येईल. उत्तर यात्रा मंगळवार, दि. २२ रोजी होणार असून, त्या दिवशी मुख्य यात्रेची समाप्ती होणार आहे.मांढरगडावर येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची सोय केली आहे. परंतु त्याचा अपव्यय टाळावा. यात्राकाळात परिसर स्वच्छ ठेवावा, ठरवून दिलेल्या वाहनतळावरच वाहने पार्किंग करून वाहतुकीची कोंडी टाळावी, रांगेत जाऊन दर्शन घ्यावे, असे प्रशासन व देवस्थान ट्रस्टमार्फत केले आहे.पशुहत्यास बंदीविश्वस्त मंडळाने भाविकांचे सुरक्षिततेसाठी काही निर्णय घेतले आहेत. यात्रेदरम्यान परिसरात पशुहत्येस मनाई केली आहे. झाडांवर खिळे ठोकणे, लिंबे टाकणे, काळ्या बाहुल्या बांधणे आदी प्रकार बंद करण्यात आले आहे.देवीचे दर्शन सुलभतेने घेण्यासाठी तसेच दर्शन घेतल्यानंतर खाली उतरण्यासाठी स्वतंत्र मार्ग केला आहे. मांढरदेव देवस्थान व विश्वस्त मंडळामार्फत विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत.