पिंपोडे ब्रुदुक : उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करित असतानाच सध्या रब्बी ज्वारी पिकाचे रानडुकरे अतोनात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थती निर्माण झालेली आहे.यापूर्वी सोळशी, रणदुल्लाबाद, करंजखोप, सर्कलवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी, आसनगाव या डोंगर पायथ्याच्या गावाना वन्य प्राण्यांचा त्रास नित्याचा होता. डोंगर पायथ्याच्या शेतीचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या प्रान्यांकडून होत होते. आजही होते आहे. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षापासून अगदी मानवी वस्तीजवळ हे प्राणी येऊ लागले आहेत. त्यामुळे नित्य रहदारी असलेल्या रस्त्याकडेच्या शेतातही हे प्राणी दिवसाही वास्तव्य करू लागले आहेत. त्यामुळे सध्या शेतात एकट्याने जाणे धाडसाचे ठरू लागले आहे.पिंपोडे बुद्रुकसह परिसरातील शिवारात ज्वारींचे पीक बहरात येऊ लागले आहे. मुळातच दुष्काळी सावटाचाली इथला शेतकरी वावरतो आहे. कधी अचानक थंडी वाढत आहे. तर कधी अवकाळी पाऊस या बदलत्या निसर्गचक्रामधून सध्या उभी असलेली ज्वारी, गहु, हरभरा ही पिके अजूनही पूर्णपणे हातात येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.अशातच सध्या पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, घिगेवाडी, आसनगाव येथील शिवारात रानडुकरांनी धुमाकुळ घातला आहे. ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर रानडुकरे नुकसान करित आहेत. त्यामुळे सध्या निसवलेली व पोटऱ्यात असलेली ज्वारी डोळ्यादेखत आडवी झालेली पहावी लागत आहे. या रानडुकरांचा बंदोबस्त करणे शेतकऱ्यांसाठी अशक्य काम आहे. त्यामुळे वन खात्याने लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे. (वार्ताहर)४गेल्या चार वर्षापासून सोळशी, ता. कोरेगाव येथिल डोंगर रांगेपासून अरबवाडी, दुधनवाडी पर्यंतच्या डोंगरावर पवनचक्क्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्याकामी डोंगरमधून मोठ-मोठे रस्ते करण्यात आलेले आहेत. पवनचक्क्यांच्या सुरक्षेसाठी तेथे सुरक्षा रक्षक काम करतात. त्याचबरोबर पात्यांच्या घर-घर आवाजामुळे वन्य प्राण्यांनी आपले निवासस्थान बदलल्या लक्षात येते. एरव्ही दाट झाडी अथवा अडोशाला राहणारे लांडगा, तरस, रानडुक्कर आणि वन्यप्राणी सध्या मानवी वस्तीकडे सरकल्याचे लक्षात येते. अन् त्याचमुळे ऊस अथवा ज्वारीच्या पिकाचा आडोसा रानडुक्कर अथवा लांडगा, तरस या या प्राण्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. पिकांच्या नुकसानीस हे प्राणी कारणीभूत ठरु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसाणीस सामोरे जावे लागत आहे.सध्या ज्वारी पोटरा धरू लागली आहे. त्यामुळे ज्वारीचे नुकसान भरून निघणार नाही. जवळपास अर्ध्या एकरामध्ये ज्वारीचे पीक अर्ध्यातच कुरतडुन टाकून रानडुकरांनी नुकसान केले आहे. वन विभागाने या प्राण्यांच्या बंदोबस्त करणे आवश्यक आहे.-नानासाहेब लेंभे, शेतकरी पिंपोडे बुदु्रकवन्य प्राणी मानवी वस्तीकडे सरकू लागलेरात्र गस्त धोकादायकपिकांचे नुकसान हे बहुतेकवेळा रात्रीचेच होत असते. हे प्राणी दिवसां अडचणीचे ठिकाण शोधतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जर शेतकऱ्यांनी रात्रगस्त घालून या पाण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केल्यास ते धोकादायक ठरू शकते. लांडग्यांचा कळप अथवा रानडुकर माणसावर प्रतिहल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे शेतकरी हा धोका पत्करु शकत नाहीत.विद्युत करंटचा प्रयोगअनेक वेळा शेतकरी रानडुकरांच्यापासून पिकांचे संरक्ष करण्यासाठी विद्युत करंट देण्याचा प्रयोग केला जातो. शेतीच्या चौफेर तारांचे कुंपन तयार करून त्याला विद्युत करंट देण्यात येतो. त्यामुळे रानडुक्कर करंट लागल्यास सहजासहजी पिकात शिरकाव करू शकत नाही. मात्र संबंधित शेतकरी अथवा शेजारी किंवा अन्य कुणी त्या शेतामध्ये गेल्यास आणि याचा अंदाज न आल्यास मोठी जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे तो प्रयोगही अंगलट येण्याची शक्यताच जास्त असते.वन्य प्राणी मानवी वस्तीकडे सरकू लागलेरात्र गस्त धोकादायकपिकांचे नुकसान हे बहुतेकवेळा रात्रीचेच होत असते. हे प्राणी दिवसां अडचणीचे ठिकाण शोधतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जर शेतकऱ्यांनी रात्रगस्त घालून या पाण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केल्यास ते धोकादायक ठरू शकते. लांडग्यांचा कळप अथवा रानडुकर माणसावर प्रतिहल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे शेतकरी हा धोका पत्करु शकत नाहीत.विद्युत करंटचा प्रयोगअनेक वेळा शेतकरी रानडुकरांच्यापासून पिकांचे संरक्ष करण्यासाठी विद्युत करंट देण्याचा प्रयोग केला जातो. शेतीच्या चौफेर तारांचे कुंपन तयार करून त्याला विद्युत करंट देण्यात येतो. त्यामुळे रानडुक्कर करंट लागल्यास सहजासहजी पिकात शिरकाव करू शकत नाही. मात्र संबंधित शेतकरी अथवा शेजारी किंवा अन्य कुणी त्या शेतामध्ये गेल्यास आणि याचा अंदाज न आल्यास मोठी जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे तो प्रयोगही अंगलट येण्याची शक्यताच जास्त असते.
दुष्काळात डुकरांचा महिमा!
By admin | Updated: January 14, 2015 23:37 IST