शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

बर्ड फ्लूच्या धास्तीनं कबुतरं खुराड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

सातारा: जिल्ह्यातील लोणंद परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. याची धास्ती साताऱ्यातही जाणवत आहे. दिवसभर आकाशात स्वच्छंदी फिरणारे कबुतरं ...

सातारा: जिल्ह्यातील लोणंद परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. याची धास्ती साताऱ्यातही जाणवत आहे. दिवसभर आकाशात स्वच्छंदी फिरणारे कबुतरं आता घरातच खुराड्यात बंदिस्त केले आहेत. तेथेच त्यांना खाण्यासाठी धान्य टाकले जात आहे. (छाया : जावेद खान)

१८जावेद०२

०००००००००००

एकेरी वाहनांचा प्रवेश

सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमधून सर्वच दिशांना एकेरी वाहतूक होणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भात अमूक दिशेला वळू नका, या आशयाचे फलक लावले आहेत. तरीही असंख्य दुचाकीस्वार उलट्या दिशेने वाहने चालवित असतात. हे धोक्याचे ठरू शकते.

०००००००००

भुयारी मार्गात पट्ट्या

सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमधील अनेक लहान-मोठी कामे सुरू आहेत. तसेच वाहतूक सुरू झाल्यामुळे एक-एक उणिवा दिसून येत आहेत. त्यामुळेच पालिकेकडून बसस्थानकाकडे जाण्याच्या मार्गावर तीव्र उतार आहे. त्यामुळे वाहनचालकांना धोका लक्षात यावा, यासाठी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या ओढल्या आहेत. त्यामुळे वेग कमी होणार आहे.

०००००००

विना हेल्मेट प्रवास

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेग चांगलाच वाढला आहे. त्यातून काही ना काही अडथळे येत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांनी सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तरीही अनेक जण विना हेल्मेट बिनधास्त वाहने चालवित आहेत.

००००००००

गतिरोधकाची गरज

सातारा : साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरातून राजवाड्याकडे येण्यासाठी तीव्र उतार आहे. या उतारावरून येणाऱ्या वाहनांचा वेगही जास्त असतो. परिसरात अपघातांचा धोका असल्याने या मार्गावर एक-दोन ठिकाणी तरी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

००००००००

मार्गदर्शक फलक

खटाव : खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर मार्गदर्शक फलक, दिशादर्शक, पुढील गावे, किलोमीटर यांची माहिती देणारे फलक लावलेले आढळत नाहीत. त्यामुळे एखाद्या वेळेस प्रवास करत असलेल्या वाहनचालकांची फसगत होत आहे. त्यामुळे आवश्यक तेथे फलक लावण्याची मागणी होते.

०००००

बंदी असतानाही गुलालाची उलाढाल

सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील मतमोजणी सोमवारी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आली. वास्तविक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मिरवणूक काढणे, गुलालाची उधळण करण्यावर बंदी घातली होती. तरीही अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. त्यामुळे उलाढालही वाढली होती.

०००००००

मास्कचे दर कमी

सातारा : कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा बाजारपेठेत मास्कची उपलब्धताही कमी होती. त्यामुळे मास्कचे दर प्रचंड तेजीत होते. आता अनेक कंपन्या तसेच स्थानिक कारागिरांनी मास्क बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विविध आकारातील प्रकारातील मास्क कमी दरात मिळत आहेत.

०००००००००

वाहनांतून पेट्रोल चोरी

सातारा : सातारा शहरातील बहुमजली इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकींमधून पेट्रोल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. काहींनी पेट्रोल लॉक बसविले आहेत. तरीही पेट्रोल चोरीला कसे जात आहे, हा प्रश्न चालकांना सतावत आहे.

०००००००००

सीसीटीव्हीची गरज

सातारा : जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये बहुमजली इमारती आहेत. त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असली तरी खासगी सुरक्षा रक्षक ठेवलेले नाहीत. त्यामुळे चोरीच्या घटनांचा धोका जास्त असतो. संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन केले आहे.

०००००

बॅग व्यवसायिक त्रस्त

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. याचा फटका जिल्ह्यातील शालेय पिशव्या, बॅग बनविणाऱ्या व्यवसायावर बसला आहे. संबंधित व्यवसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे.

०००००००००

डोकेदुखीत वाढ

सातारा : साताऱ्यासह परिसरातील वातावरणात बदल होत आहे. गरम वारे वाहत असल्याने आजारी पडणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये सर्दी, खोकला, डोकेदुखी आदी आजार जडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

००००००००

नारळाची उलाढालीला चांगलाच फटका

सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला होता. त्याचा परिणाम अनेक लहान मोठ्या व्यवसायाला बसला आहे. त्यातीलच एक म्हणजे नारळ. यात्रांमध्ये देवासमोर नारळ फोडले जात असल्याने त्यांना मोठी मागणी असते. मात्र कोरोनानंतर यात्रा बंद झाल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

०००००००००

बॅरिकेटचाच धोका

सातारा : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून बॅरिकेटचा वापर केला जातो. त्यामुळे पोलिसांची मोठी सोय होते. मात्र सातारा बसस्थानक समोर लावलेले बॅरिकेट वेडेवाकडे लावलेले असतात. एखादे वाहन अडकले तर मोठी दुर्घटना घडू शकते.

००००००००

हवेची खेळणी दाखल

सातारा : लहान मुलांना दूरचित्रवाहिणींवरील कार्टुन प्रचंड आवडत असतात. याच दुनियेतील पात्रांची खेळणी साताऱ्याच्या बाजारात दाखल झाले आहेत. हे खेळणी हवेवरची असल्याने ते कमी दरातही उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांना ते घेऊन देणेही परवडत आहे.

०००००

उत्सवाने ओलांडल्या उपस्थितांच्या मर्यादा

सातारा : गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लग्न समारंभ, अंत्यसंस्कारासही उपस्थित राहण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. अजूनही बंधने आहेत. मात्र कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी येत असल्याने नागरिकांमधील भीती कमी झाली आहे. त्यामुळे बारसं, लहान मुलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही शे-पाचशे लोकांना निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.