शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे होणार, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

By नितीन काळेल | Updated: October 10, 2023 23:17 IST

१०५ किलोमीटरचा मार्ग; राज्याचा सहभाग ९२१ कोटींचा

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेला फलटण-पंढरपूर नवीन ब्राॅडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयाच्यावतीने पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १०५ किलोमीटरच्या या मार्गासाठी राज्य शासनाकडून ९२१ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत.

फलटण-पंढरपूर नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाबाबत नेहमीच चर्चा सुरू आहे. त्यातच लोणंद-फलटण रेल्वेमार्ग तयार होऊन त्यावरुन रेल्वेही धावली. पण, पंढरपूर मार्गाबाबत उदासिनता दिसून आली. आता मात्र, फलटण-पंढरपूर नवीन ब्राॅडगेज रेल्वेमार्गासाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नातूनच मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत काही निर्णय घेण्यात आले. कारण, या मार्गासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) १ हजार ८४२ कोटी खर्चाचा अहवाल तयार केला आहे. यात राज्याचा सहभाग ९२१ कोटींचा आहे. हा निधी टप्प्याटप्पयाने उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पण, हा रेल्वेमार्ग आता महारेलएेवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाला गती येणार आहे.

१२ ते १४ महिन्यात काम पूर्ण होईल...

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासनाचेही आभारी आहे. कारण, रेल्वे मंत्रालयामार्फत काम होणार असल्याने रेल्वेमार्गाला गती येणार आहे. तसेच एकदा काम सुरू केल्यानंतर १२ ते १४ महिन्यांत मार्ग पूर्ण करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानसही आहे. या मार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के वाटा दिलेला आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार माढा

टॅग्स :railwayरेल्वे